28 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2018)
शतकांची हॅटट्रिक करत कॅप्टन कोहलीने केला विक्रम :
- विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सलग तिसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
- तर त्याने या सामन्यात 110 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि सलग तीन एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा विक्रम केला.
- कोहलीने पहिल्या सामन्यात 140 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात तो 157 धावा काढून नाबाद होता.
- तसेच असा विक्रम करणारा तो जगातील दहावा खेळाडू ठरला आहे.
- तर यात सलग 4 शतकांसह श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा पहिल्या क्रमांकावर आहे.
सिंधू, श्रीकांतही फ्रेंच ओपनमधून बाहेर :
- ऑलिम्पिक रौप्यविजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडले आहेत.
- तर या पराभवासह एकेरीतील भारताचे आव्हानदेखील संपुष्टात आले आहे.
- तिसरी मानांकित सिंधूला चीनची सातवी मानांकितही बिगजियाओने 21-13,21-16 ने पराभूत केले.
- तर यंदा चीनच्या या खेळाडूकडून सिंधूचा सलग दुसरा पराभव ठरला.
- तसेच पाचवा मानांकित के. श्रीकांत हा जपानचा केंतो मोमोता याच्याकडून 16-21,19-21 ने पराभूत झाला. यंदा श्रीकांतचा केंतोकडून सलग पाचवा तसेच एकूण सातवा पराभव ठरला.
Must Read (नक्की वाचा):
संजयकुमार मिश्रा “ईडी’च्या प्रमुखपदी नियुक्त :
- आयआरएस अधिकारी संजयकुमार मिश्रा यांना अतिरिक्त कार्यभारासह ईडी (सक्तवसुली संचालनालय)च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- तर एका शासकीय आदेशान्वये नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे.
- प्राप्तिकर कॅडरच्या 1984 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी मिश्रा यांना ईडीत मुख्य विशेष संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.
- त्यांना तीन महिन्यांसाठी ईडीच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मिश्रा हे मावळते कर्नल सिंह यांची जागा घेणार असून, त्यांचा कार्यकाळ 28 ऑक्टोबर 2018 रोजी संपणार आहे.
- तर सिंह हे केंद्रशासित प्रदेशच्या कॅडरच्या 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी ईडीच्या संचालकपदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत.
दिनविशेष :
- 28 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन
- 28 ऑक्टोबर 1420 मध्ये बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
- क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर 28 ऑक्टोबर 1490 मध्ये क्युबा मध्ये पोहोचले.
- अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) 28 ऑक्टोबर 1636 मध्ये स्थापना झाली.
- 28 ऑक्टोबर 1969 मध्ये तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा