28 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
28 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 मार्च 2022)
‘एमआरसॅम’च्या लष्करी आवृत्तीची यशस्वी चाचणी :
- जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एमआरसॅम) लष्करी आवृत्तीची भारताने शनिवारी ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून यशस्वी चाचणी केली.
- तर दीर्घ पल्ल्याचे निकष पूर्ण करून सकाळी 10 वाजता या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली, असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सांगितले.
- एमआरसॅम- आर्मी मिसाईल सिस्टिम फ्लाइटची बालासोर येथील चाचणी तळावरून चाचणी करण्यात आली.
- तसेच या क्षेपणास्त्राने अतिशय वेगाने मार्गक्रमण करून लांब अंतरावरील हवेतील एक लक्ष्य टिपले.
Must Read (नक्की वाचा):
भारताची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पूर्ववत :
- भारताने रविवारी सर्व आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक पूर्ववत सुरू केली.
- करोना साथीमुळे महत्त्वाच्या बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीस भारताने दोन वर्षांपासून बंदी घातली होती.
- तर येत्या उन्हाळय़ात एक हजार 783 परदेशी विमानांची साप्ताहिक उड्डाणे होतील तर एक हजार 466 भारतीय विमाने दर आठवडय़ाला परदेशी जातील.
- नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा भारतीय विमाने आणि 63 देशांतील 60 परदेशी विमाने रविवारपासून भारताला जगाशी जोडतील.
संरक्षण मंत्रालयाची 21 नवीन सैनिक स्कूल स्थापन करण्याची घोषणा :
- संरक्षण मंत्रालयाने शनिवारी 21 नवीन सैनिक स्कूल सुरू करण्यास मंजुरी दिली.
- तर स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीत ही स्थापना केली जाईल.
- तसेच या शाळा सहावीपासून सुरू होतील. सरकार भागीदारी पद्धतीने देशभरात अशा आणखी 79 सैनिक शाळा उघडणार आहे.
- संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार या नवीन शाळा सध्याच्या सैनिक शाळांपेक्षा वेगळ्या असतील.
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारतीय संघ पराभूत :
- गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील निराशाजनक कामगिरीचा भारतीय महिला क्रिकेट संघाला फटका बसला.
- रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
- आफ्रिकेला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर तीन धावांची आवश्यकता असताना भारताची ऑफ-स्पिनर दीप्ती शर्माने मिग्नन डूप्रीझला बाद केले; पण चेंडू टाकण्यापूर्वी दीप्तीचा पाय क्रीजच्या पुढील रेषेबाहेर गेल्याने तो ‘नो-बॉल’ ठरवण्यात आला.
- त्यानंतरच्या दोन चेंडूंवर दोन धावा काढत आफ्रिकेने हा सामना तीन गडी राखून जिंकला.
- आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, गतविजेते इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बॅडिमटनपटू जयरामची निवृत्ती :
- भारताच्या अजय जयरामने रविवारी आंतरराष्ट्रीय बॅडिमटनमधून निवृत्ती जाहीर करताना दोन दशकांच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.
- 34 वर्षीय जयरामने समाजमाध्यमांवर निवृत्तीची घोषणा केली.
स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धात सिंधूला विजेतेपद :
- भारताची दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी स्विस खुल्या स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.
- पुरुष एकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या सिंधूने चौथ्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानला 21-16, 21-8 अशी सरळ गेममध्ये धूळ चारली.
- यंदा मात्र दुसऱ्या मानांकित सिंधूने खेळ उंचावत जेतेपदाला गवसणी घातली.
- तर तिचा बुसाननवरील हा 17 सामन्यांतील 16वा विजय ठरला.
धोनीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद :
- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 15 व्या हंगामाला सुरुवात झालेली आहे.
- चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या हंगामातील पहिला सामना रंगला.
- तर महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचला.
- धोनी आयपीएलमध्ये पन्नास धावा म्हणजेच अर्धशतक करणारा सर्वात जास्त वय असलेला भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
- तसेच धोनीने 38 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.
- धोनीपूर्वी, आयपीएलमध्ये सर्वात वयस्कर म्हणून अर्धशतकं झळकावणाऱ्यांमध्ये अॅडम गिलख्रिस्ट आणि ख्रिस गेल आहेत.
‘बीसीसीआय’कडून ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार :
- शनिवारी ‘आयपीएल’च्या सलामीच्या लढतीपूर्वी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने (बीसीसीआय) सत्कार करण्यात आला.
- सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला एक कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
- ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता.
- तसेच कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेनला 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
- तसेच टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला एकत्रित एक कोटी रुपये देण्यात आले.
दिनविशेष:
- सन 1910 मध्ये हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
- रासबिहारी बोस यांनी सन 1942 मध्ये टोकियो येथे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली.
- सन 1992 मध्ये उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हन्स कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-10000 हा महासंगणक देशाला 1998 मध्ये अर्पण करण्यात आला.