28 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

28 July 2018 Current Affairs In Marathi

28 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 जुलै 2018)

भारत-रशिया यांच्यात व्दिपक्षीय चर्चा :

  • दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मोदी यांची रशियातील सोशी येथे मे महिन्यात अनौपचारिक भेट झाली होती. दोन्ही नेते शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर बैठकीत जूनमध्ये चीनमधील क्विंगडाव येथे भेटले होते.
  • पुतिन यांच्याशी विस्तृत व फलदायी चर्चा झाली. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सहकार्य आहे व ते यापुढेही सुरू राहील असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, पर्यटन यातील मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. Untitled Meeting
  • मोदी-पुतिन यांच्यात मध्यरात्रीनंतरही चर्चा सुरू होती. मे महिन्यात सोशी येथील चर्चेत विशेष धोरणात्मक भागीदारीवर चर्चा झाली होती. मोदी यांचे दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर बैठकीसाठी येथे आगमन झाले. ब्रिक्स इन आफ्रिका हा या वेळच्या बैठकीचा मध्यवर्ती विषय आहे.
  • ब्रिक्स संघटनेची स्थापना 2009 मध्ये झाली असून त्यात ब्राझील, रशिया, भारत, चीनदक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्यात जगातील चाळीस टक्के लोकांचा समावेश होतो.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जुलै 2018)

मुंबई महापालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय शाळा सुरू होणार :

  • पालकांकडून होणारी आंतरराष्ट्रीय शाळांची वाढती मागणी आणि इंग्रजीकडे असलेला कल लक्षात घेता मुंबईत महापालिकेतर्फे 35 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केल्या जाणार आहेत. दहावीपर्यंतच्या या नवीन शाळा खासगी सहभागातून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
  • पालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे. विद्यार्थी गळती वाढल्याने अनेक शाळा बंद पडल्या, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाने सार्वजनिक-खासगी सहभागाने (पीपीपी) शिशूवर्ग ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे.
  • तसेच या शाळांमध्ये खासगी संस्थांचे शिक्षक शिकवणार असले तरी महापालिकेमार्फत मिळणाऱ्या मोफत वस्तू, पोषण आहार अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातील. गोरगरीब विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे.

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या :

  • उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे आता सातारचे पोलिस अधीक्षक झाले आहेत. येथील अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक झाली आहे.
  • 27 जुलै रोजी रात्री उशिरा राज्यातील 95 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात यांचा समावेश आहे.
    अधीक्षक पाटील यांनी गेल्या दोन वर्षात साताऱ्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जोरदार कामगिरी केली. मोक्का कायद्यानुसार कारवाई करत त्यांनी जिल्ह्यातील खासगी सावकारांचे कंबरडे मोडले. Maharashtra Police
  • तसेच तडीपारीच्या शंभरहून अधिक कारवाया करून टोळीने गुन्हे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. साताऱ्यातील बरेच नामचीन त्यामुळे कारागृहाची हवा खात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर चांगलीच दहशत निर्माण झाली. सातारकरांच्या कायम स्मरणात राहील अशी कारकीर्द त्यांनी केली.
  • पंकज देशमुख हे 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी नांदेड येथे सहायक अधीक्षक तर नगर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

भारतीय महिला तिरंदाजांची गगनभरारी :

  • भारतीय महिला तिरंदाजांनी सांघिक प्रकारामध्ये जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. ऑगस्ट महिन्यात आशियाई खेळांआधी भारतीय तिरंदाजी संघासाठी ही आश्वासक गोष्ट मानली जात आहे.
  • बर्लिन येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे. 342.60 गुणांसह सध्या भारतीय महिला अव्वल स्थानावर आहेत.
  • तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीन तैपेईच्या खात्यात 336.60 गुण जमा आहेत. व्ही. ज्योती सुरेखा, त्रिशा देब, पी. लिली चानू, मुस्कान किरर, दिव्या धयाल आणि मधुमिता या खेळाडूंनी भारतीय संघाला पहिले स्थान मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी दर कमी :

  • वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून प्रथमच ग्राहकांना इलेक्ट्रीक वस्तू सात ते नऊ टक्के कमी दराने विकत घेता येणार आहेत.
  • केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 21 जुलै रोजी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या 28व्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्यात आला.
  • जीएसटी कररचनेत इलेक्ट्रॉनिक उत्पादने 28 टक्क्यांच्या कक्षेत ठेवण्यात आली होती. आता काही इलेक्ट्रॉनिक उत्पादने 18 टक्क्यांच्या कक्षेत आली आहेत. GST
  • टीव्ही, फ्रिज, व्हॅक्युम क्लिनर्स, वॉशिंग मशिन या दैनंदिन घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. या कर कपातीचा मध्यमवर्गीय ग्राहकांना नक्कीच फायदा होईल पण त्यामुळे सरकारी तिजोरीला कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
  • तसेच जीएसटी परिषदेने मागच्या आठवडयात झालेल्या बैठकीत एकूण 85 उत्पादनांवर कर कपात घोषित केली आहे.

दिनविशेष :

  • 28 जुलै हा ‘जागतिक हेपटायटीस दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधकबारूच सॅम्युअल ब्लमबर्ग‘ यांचा जन्म 28 जुलै 1925 मध्ये झाला.
  • सन 1998 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन झाले.
  • आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना सन 2001मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.