28 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 जानेवारी 2020)
इस्रो देणार ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट :
- देशाच्या संरक्षणात, आपत्ती व्यवस्थानात उपयोगी ठरणारं असं अमूल्य गिफ्ट इस्रो व्हॅलेंटाईनच्या कालावधीत देशाला देईल. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इस्रोकडून जीआयसॅट-1 (GiSAT-1) उपग्रह अवकाशात सोडणार आहे.
- तर जीआयसॅट-1 उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये एकाच ठिकाणी थांबून देशाच्या सीमांची टेहळणी करेल. हा उपग्रह दर अर्ध्या तासाला देशाचा एक फोटो पाठवेल.
- तसेच यामुळे पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरील हालचालींची माहिती सतत मिळत राहील.
- पाकिस्तानमधून सतत भारतीय हद्दीत घुसखोरींचे प्रयत्न सुरू असतात. त्यावर अंतराळातून जीआयसॅट-1 रुपी तिसरा डोळा लक्ष ठेवेल.
- जीआयसॅट-1 मध्ये पाच प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. इस्रो जीआयसॅट मालिकेतले दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहे. जीआयसॅट-1 च्या प्रक्षेपणानंतर इस्रो जीआयसॅट-2 अवकाशात पाठवेल.
- जीआयसॅट-1चं प्रक्षेपण 15 जानेवारीला करण्यात येणार होतं. इस्रोनं ही तारीख जाहीरदेखील केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यानं हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं.
- आंध्रप्रदेशातल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून जीआयसॅट-1 चं प्रक्षेपण करण्यात येईल. या मोहिमेत जीएसएलव्ही-एके2 प्रक्षेपक म्हणून काम करेल.
- तसेच जीआयसॅट-1 मध्ये कार्टोसेट उपग्रहात अतिशय सामर्थ्यशाली पॅनक्रोमॅटिक कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा अर्ध्या तासानं देशाचा फोटो काढेल.
- याशिवाय उपग्रहातले बाकीचे कॅमेरेदेखील सतत फोटो टिपून ते इस्रोला पाठवतील. जीआयसॅट-1 केवळ दिवसाच फोटो काढू शकतो. रात्रीचे फोटो टिपण्यासाठी इस्रो जीआयसॅट मालिकेतला दुसरा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
रवी यादव किकेट विश्वातील ठरला पहिलाच क्रिकेटपटू :
- क्रिकेट जगतात शेकडो विकेट घेणारे भले भले गोलंदाज होऊन गेलेत पण आजपर्यंत जगभरात कुणालाही न जमलेला विक्रम मध्यप्रदेशचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी यादव याने आपल्या पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात केला आहे.
- उत्तर प्रदेशविरुध्दच्या रणजी सामन्यात आपल्या पाहिल्याच षटकात त्याने हॅटट्रीक घेतली आणि क्रिकेटच्या इतिहासात प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणातील पहिल्याच षटकात हॅटट्रीक नोंदवणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.
- तर होळकर स्टेडीयमवरच्या या सामन्यात रवीने सोमवारी एकच षटक टाकले. उत्तर प्रदेशच्या डावातील ते सातवे षटक होते. त्यातील तिसºया चेंडूवर त्याने आर्यन जुयाल याला यष्टीरक्षकाकडून झेलबाद केले.
PFवरच्या व्याजदराची सरकारकडून घोषणा :
- केंद्र सरकारनं जानेवारी-मार्चच्या तिमाहीत जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)वर मिळणाऱ्या व्याजदराची घोषणा केली आहे.
- केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागानं गेल्या काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी करून माहिती दिली आहे.
- जानेवारी ते मार्च 2020साठी GPFवर 7.9 टक्के व्याज मिळणार आहे. कार्मिक, लोकसंख्या आणि पेन्शन मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, एक वर्ष पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगार, निवृत्तीनंतर पुन्हा कामावर रुजू झालेले आणि सरकारी कर्मचारी कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंड नियम 1960अंतर्गत येतात.
- तसेच पेन्शन सुरू होण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच या प्रॉव्हिडंट फंडचं सब्सक्रिप्शन बंद केलं जातं.
‘खेलो इंडिया’ विजेत्यांना रोख पुरस्कार :
- गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावणार्य महाराष्ट्रातील 399 खेळाडूंना एकूण 3 कोटी 6 लाख 25 हजार रूपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत.
- तसेच वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात सुवर्ण विजेत्या 78 खेळाडूंना प्रत्येकी 1 लाख, रौप्य विजेत्या 77 खेळाडूंना प्रत्येकी 7 हजार आणि कांस्य विजेत्या 102 खेळाडूंना प्रत्येकी 50 हजाराचा रोख पुरस्कार दिला जाईल.
- तर महाराष्ट्राच्या 590 खेळाडूंनी 20 पैकी 19 खेळात स्पर्धेत भाग घेतला होता. राज्याने सर्वाधिक 46 पदकांची कमाई जलतरणात केली असून जिम्नॅस्टिक्समध्ये 40,कुस्तीमध्ये 31, अॅथलेटिक्समध्ये 29 आणि वेटलिफ्टिंगमध्ये 25 पदकांचा प्रामुख्याने समावेश आहे.
राफेल नदाल, झ्वेरेव, थीएम व हालेप यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक :
- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला राफेल नदाल, जर्मनीचा अलेक्झँडर झ्वेरव, ऑस्ट्रियाचा पाचवा मानांकित डॉमिनिक थीएम यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये दोनवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सिमोना हालेपने विजयी कूच कायम ठेवली.
- स्पेनच्या अव्वल मानांकित खेळाडूला स्थानिक दावेदार निक किर्गियोसने कडवी लढत दिली. पण नदालने रॉड लेवर परिसरात 6-3, 3-6, 7-6, 7-6 अशी बाजी मारली.
- नदालला अंतिम आठमध्ये डॉमिनिक थीएमविरुद्ध खेळेल. थीएमने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचा 6-2, 6-4, 6-4 असा पराभव केला.
सामन्यादरम्यान जखमी खेळाडूंसाठी गव्हर्निंग काऊन्सिलने घेतला मोठा निर्णय :
- आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गव्हर्निंग काऊन्सिलने मोठा निर्णय घेतला आहे.
- आयसीसीच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो, आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.
- तर या नियमाला CONCUSION SUBSTITUTE असं म्हटलं जातं. आयपीएलच्या आगामी हंगामीठीही हा नियम लागू करण्यात येणार आहे.
- तसेच गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी याबद्दल माहिती दिली.
दिनविशेष:
- स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये झाला होता.
- स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म 28 जानेवारी 1899 मध्ये झाला होता.
- शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म 28 जानेवारी 1925 मध्ये झाला होता.
- एच.एम.टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना सन 1961 मध्ये बंगलोर येथे सुरू झाला.
- सन 1977 मध्ये मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे 15वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Plz try to correct …silver medlist 70 thousand