28 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

राष्ट्रीय विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान दिन

28 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 फेब्रुवारी 2023)

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार:

 • विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे.
 • पहिल्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं.
 • दरम्यान, यासंदर्भात बोलताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

एक कोटी लाभार्थीच्या ‘सेल्फी’ पंतप्रधानांना पाठविण्याचा उपक्रम:

 • ‘मला चष्मा मिळाला, चालण्याला आधार होईल असे वॉकर मिळाले. ‘वयोश्री’ योजनेमुळे मला खूप मदत झाली.
 • अशी योजना आखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद’ असे सांगत सोमवारी वयोवृद्ध शीलाताई पत्की यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्या आजीबरोबर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढला आणि तो ‘नमो’ अ‍ॅपवर ‘ पाठवून’ दिला.
 • अशा एक कोटी स्वप्रतिमा अर्थात सेल्फी पाठविण्याच्या देशातील पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी औरंगाबाद येथे करण्यात आले.
 • ‘धन्यवाद मोदीजी’ या शब्दांसह लाभार्थीनी पाठविलेल्या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी स्वप्रतिमा (सेल्फी ) कार्यक्रम भाजपच्या वतीने सोमवारी स्मृती इराणी यांच्या हस्ते झाला.
 • जनधन बँक खाती, कोविडची मोफत लस घेणारे, उज्ज्वला गॅस, स्वच्छता गृह इथपासून ते प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळविणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि त्यांचे छायाचित्र व दहा सेकंदाचे चलचित्रण पक्ष कार्यालयाकडे पाठवा, असा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

मेग लॅनिंगने पाँटिंग-धोनीला मागे टाकत रचला इतिहास:

 • मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी टी-20 विश्वचषक 2023 चा चॅम्पियन बनला.
 • केपटाऊनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला.
 • बेथ मुनीच्या (53 चेंडूत नाबाद 74 धावा) शानदार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 156/6 अशी धावसंख्या उभारली.
 • ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला आहे.
 • त्याचबरोबर मेग लॅनिंगने एक मोठा विक्रम केला आहे.
 • लॅनिंगने ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम मोडला आहे.
 • लॅनिंग ही सर्वात मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकणारी कर्णधार बनली आहे. लॅनिंगने आतापर्यंत ५ स्पर्धा जिंकल्या आहेत.
 • त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने चार टी-20 विश्वचषक आणि एक वनडे विश्वचषक जिंकला आहे.
 • त्याचबरोबर पाँटिंगने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाला चार आयसीसी ट्रॉफी मिळवून दिल्या.
 • त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन एकदिवसीय विश्वचषक आणि दोन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या आहेत.
 • त्याचबरोबर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत

दिनविशेष:

 • 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ आहे.
 • मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1897 रोजी झाला होता.
 • भारताचे 10वे उपराष्ट्रपती ‘कृष्णकांत‘ यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1927 मध्ये झाला होता.
 • सन 1928 मध्ये डॉ. सी.व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
 • वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध सन 1935 मध्ये लावला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मार्च 2023)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.