28 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

28 December 2019 Current Affairs In Marath
28 December 2019 Current Affairs In Marath

28 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2019)

मिग 27 विमानांची निवृत्ती :

  • वीस वर्षांपूर्वी 1999 च्या कारगिल युद्धात मोठी भूमिका पार पाडणारी मिग 27 विमाने शुक्रवारी सेवेतून काढून घेण्यात आली. या विमानांनी शुक्रवारी येथील विमानतळावरून शेवटचे उड्डाण केले.
  • भारतात ‘बहादूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानांनी शांतता व युद्धकाळात मोठी भूमिका पार पाडली असून कारगिल युद्धात शत्रूच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आघाडीवर होती. ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये ती सहभागी होती.
  • मिग 27 विमानांचा वापर काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सरावांमध्ये करण्यात आला होता.
  • तसेच रशियन बनावटीचे हे विमान असून त्याचे इंजिन शक्तिशाली होते. त्याच्या पंखांची भौमितिक रचना ही वैमानिकाला पंखाचा कोन सहज बदलता येईल अशा तऱ्हेने केलेली होती. आता ही विमाने 31 मार्च 2020 रोजी हवाई दलाच्या संग्रहालयात ठेवली जातील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2019)

महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुट :

  • रवाइन हॉटेलतर्फे आयोजित केलेल्या ‘एमएसएलटीए’ अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सालसा आहेरने दुहेरी मुकुट पटकावला.
  • तर एकेरी गटात तिने तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा पराभव केला, तर दुहेरी गटात युब्रानी बॅनर्जीच्या साथीने तेजस्वी काटे व सृष्टी दास जोडीला नमवले.
  • तसेच चौथ्या मानांकीत सालसाने तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित संस्कृतीचा 6-1, 6-1 एक तास, 10 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव केला. त्यानंतर दुहेरीच्या अंतिम सामन्यात सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानीसह खेळताना महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि सृष्टीचे आव्हान 6-2, 6-3 असे मोडीत काढले.
  • पुरुष एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकित सूरज प्रबोधने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित कैवल्य कलमसेचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

वृद्धापकाळात आधार ठरू शकते सरकारची ही योजना :

  • तरुण वयात नोकरी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या अनेक जणांना आपल्या वृद्धापकाळाची चिंता सतावत असते. त्यामुळे अनेक जण आपल्या कमावत्या वयात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या जीवनाच्या उत्तरार्धासाठी आर्थित तरतूद करत असतात. दरम्यान, सरकारनेही अशी एक योजना आणली आहे.
  • ज्यामधये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
  • सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडून संचालित होणाऱ्या ”प्रधानमंत्री वय वंदन योजने”च्या माध्यमातून केंद्र सरकारने वयोवृद्धांसाठी पेन्शन योजनेची व्यवस्था केली आहे.
  • तर या योजनेसाठी किमान पात्रता वय 60 वर्षे इतके आहे. त्यामुळे वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • तसेच या योजनेंतर्गत 10 वर्षांपर्यंत एका विशिष्ट्य दराने पेन्शन मिळते. जर तुम्हाला 10 वर्षांनंतर पुन्हा पेन्शन सुरू करायची असेल तर पुन्हा एकदा या योजनेत गुंतवणूक करावी लागेल.
  • प्रधानमंत्री वय वंदन योजनेंतर्गत पेंशन मिळवण्यासाठी गुंतवणूकदारास एक विशिष्ट्य तारीख, बँक खाते आणि वेळेची निवड करावी लागते. जर तुम्हाला पेन्शन 30 तारखेला हवी असेल तर ती तारीख निवडावी लागेल. त्याचबरोबर गुंतवणूकदाराला मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पर्यायांसह पेन्शनच्या क्रेडिटसाठी वेळेचा पर्याय निवडावा लागेल.
  • या योजनेत एक व्यक्ती किमान दीड लाख आणि कमाल 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. तसेच पॉलिसी खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराने जमा केलेली रक्कम 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत मिळू शकेल.

दिनविशेष:

  • सन 1836 मध्ये स्पेनने मेक्सिको या देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष सन 1846 मध्ये स्थापन झाला.
  • प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेयरमन ‘धीरूभाई अंबानी‘ यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता.
  • टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
  • सन 1948 मध्ये मुंबई मध्ये कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.