28 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

28 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2021)

‘ऑईल ड्रिलिंग रिग’ ‘MEIL’ कडून देशाला सुपूर्द :

 • ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम आणि ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत हैदराबाद स्थित ‘मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (MEIL )ने निर्माण केलेली दुसरी स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ‘ऑईल ड्रिलिंग रिग’ (तेल विहीर खोदणारी यंत्रणा) ‘ONGC’ कडे सुपुर्द केली.
 • तर या नवीन ड्रिलिंग रिग मूळे ऑइल आणि गॅसच्या उत्पादनाचा वेग तर वाढतोच शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चात देखिल बचत होते.
 • महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असल्याने वैयक्तिक सुरक्षिततेला प्राधान्य मिळते.
 • तसेच MEIL ने या वर्षाच्या सरूवातीला एप्रिलमध्ये ओएनजीसीकडे पहिली रिग सुपुर्द केली होती. जी सध्या अहमदाबादमधील मेहसाणा येथील कलोल तेल क्षेत्रात कार्यरत आहे.
 • ‘ओएनजीसी’कडे सुपुर्द करण्यात आलेली 1500 एचपी क्षमतेची दुसरी रिग हाइड्रोलिक आणि सॉफ्टवेयर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेवर काम करत असल्याने या तंत्रज्ञानाच्या फायदा ओएनजीसीला मिळेल.
 • तसेच ही रिग ओएनजीसीच्या अहमदाबादातल्या कलोलजवळ धमासणा गावात GGS- IV तेल क्षेत्रात कार्यरत होतेय.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2021)

‘मेड इन इंडिया’ ग्रेनेड भारतीय लष्कराला सुपूर्द :

 • भारतातील एका खासगी कंपनीने प्रथमच ग्रेनेड तयार केले असून त्याची पहिली बॅच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली आहे.
 • तर हे मल्टी-मोड हँड ग्रेनेड (MMHG) नागपूरमधील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने डीआरडीओच्या मदतीने तयार केले आहेत.
 • भारतीय लष्करासाठी भारतात दारुगोळा तयार होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
 • सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या मालकीची असलेल्या कंपनीने मागील महिन्यापासून सशस्त्र दलांना शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे.
 • तसेच हे ग्रेनेड पहिल्या महायुद्धाच्या विंटेज डिझाइनच्या 36 क्रमांकाच्या ग्रेनेडची जागा घेणार आहेत.
 • तर या आधुनिक ग्रेनेडमध्ये बचावात्मक आणि ऑफेंसिव्ह परिस्थितीत लवचिक रहावे, यासाठी एक विशिष्ट रचना करण्यात आली आहे.
 • डीआरडीओच्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीने हे ग्रेनेड डिझाईन केले आहेत.
 • 2016 मध्ये ईईएलने डीआरडीओ कडून तंत्रज्ञान शिकून घेतले आणि डेटोनिक्सचा दर्जा कायम राखत ते बनवले.

नीरज चोप्रा स्टेडियमचे संरक्षणमंत्र्यांनी केलं उद्घाटन :

 • पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचे नाव देण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या समारंभाचे उद्घाटन केले.
 • तर ‘नीरज चोप्रा स्टेडियम आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ असे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे.
 • राजनाथ सिंह आणि संरक्षण दलांनी नीरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
 • नीरजला 15 मे 2016 पासून 4 राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कपिल देवनंतर‘या’ खेळाडूनं लावला दुसरा नंबर :

 • टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. आतापर्यंत फक्त दोन भारतीय खेळाडूंनी अशी कामगिरी करता आली आहे.
 • इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाने 2 बळी घेतले. यासह, त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 विकेट्स पूर्ण केल्या.
 • जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
 • तर जडेजाच्या आधी हा पराक्रम फक्त भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनाच करता आला आहे.

दिनविशेष :

 • सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
 • भारतीय पदार्थवैज्ञानिक एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
 • टोयोटा मोटर्स ही सन 1937 मध्ये स्वतंत्र कंपनी बनली.
 • ‘पोकेमोन’चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1965 मध्ये झाला.
 • 28 ऑगस्ट 1969 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.