28 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

28 August 2019 Current Affairs In Marathi

28 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2019)

पीएफच्या योजनेत होणार मोठा बदल :

 • आता लवकरच ड्रायव्हर, नोकरचाकर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने वंचित घटकांना भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) कक्षेत सामावून घेण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.
 • तर सध्या मासिक किमान 15 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींनाच भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) सुविधा मिळत असली तरी यात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे.
 • पीएफची योजना राबवण्यासाठी आस्थापनांच्या मालकांना सध्याच्या नियमानुसार किमान 20 कर्मचारी असणं बंधनकारक आहे. तसंच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मासिक किमान 15 हजार रुपये पगार असणं आवश्यक आहे. परिणामी, 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी/कामगार पीएफच्या सुविधेपासून वंचित राहतात.
 • तसेच यासाठी कामगार मंत्रालयाकडून कर्मचारी निर्वाह निधी कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. ईपीएफ अँड एमपी अॅक्ट 1952 या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे एक मसुदा जाहीर करण्यात आला आहे. या मसुद्यावर संबंधित घटकांकडून 22 सप्टेंबरपर्यंत सूचना व आक्षेप मागवण्यात आले आहेत. आवश्यक बदलानंतर कोणत्याही प्रकारच्या आस्थापनात पीएफचा दर व अंशदान किती असावे हे निश्चित करण्याचा अधिकार सरकारला मिळेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2019)

एस धामी देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर :

 • भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मान मिळवला आहे. त्या ही महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
 • विंग कमांडर एस धामी हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
 • तर वायुसेनेच्या कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते.

अरूण जेटलींच स्टेडिअमला मिळणार नाव :

 • माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे निधन झाले. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
 • तर त्यांना आदरांजली म्हणून दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमला माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी केली होती.
 • तसेच त्यानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) स्टेडियमला जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (DDCA) चे अध्यक्ष रजत शर्मा यांनी ही माहिती दिली.
 • दरम्यान, हा नामकरण सोहळा 12 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात पार पडणार आहे.
 • तर यातील एका स्टँडला विराट कोहलीचे नावदेखील देण्यात येणार आहे. याची घोषणा आधीच करण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडणाऱ्या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

दिनविशेष :

 • सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
 • भारतीय पदार्थवैज्ञानिक एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
 • टोयोटा मोटर्स ही सन 1937 मध्ये स्वतंत्र कंपनी बनली.
 • ‘पोकेमोन’चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1965 मध्ये झाला.
 • 28 ऑगस्ट 1969 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.