28 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

पोलीस
पोलीस

28 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 एप्रिल 2020)

पन्नाशी उलटलेल्या पोलिसांना यापुढे सुट्टी :

 • पन्नाशी उलटलेल्या तीन पोलिसांच्या मृत्यूनंतर खडबडून जाग आलेल्या मुंबई पोलीस दलाने अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
 • तर त्यामुळे आजारी तसेच पन्नाशी उलटलेल्यांना सुट्टी देण्यात येत आहे.
 • राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे. यातील 7 पोलीस बरे झाले असून 100 जणांवर उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील 40 हून अधिक पोलिसांचा समावेश आहे.
 • तसेच पोलीस दलात पन्नाशी उलटलेल्या व आजारी असलेल्या अंमलदारांची माहिती आता गोळा करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष कक्ष तयार केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आधार अपडेट करणे होणार सोपे :

 • यूआयडीएआयने ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आधार अपडेशन करण्यासाठी आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयांतर्गत एका कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) परवानगी दिली आहे.
 • तर सीएससीकडून 20 हजार बिझनेस करस्पाँडंटकडून (बीसी) ग्रामीण भागात सुविधा देण्यात येत आहेत.
 • केंद्रीय दूरसंचार आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टष्ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
 • तसेच आधार सेवा त्यांच्या निवासस्थानाजवळ आणण्यास यामुळे मदत होईल. सीएससीचे सीईओ डॉ. दिनेश त्यागी यांनी सर्व बिझनेस करस्पाँडंट यांना सांगितले आहे की, त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण त्वरित पूर्ण करावे.
 • न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर 2018 मध्ये सीएससीच्या माध्यमातून होणारे आधारचे काम बंद करण्यात आले होते.

चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द :

 • रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठयाची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.
 • करोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तर खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 • आयसीएमआरने राज्यांना गुआंगझोऊ वोंडफो बायोटेक आणि हुहेई लिव्हझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन कंपन्यांच्या किटसचा वापर थांबवण्यास सांगितले. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. चिनी कंपन्यांकडून किट्स विकत घेण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील फॅक्ट शीटस सुद्धा मंत्रालयाने जारी केली आहे.
 • तसेच काही राज्य सरकारांनी चिनी कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्समधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयसीएमआरकडून या किट्सचे मूल्यमापन करण्यात आले. या किट्सच्या सहाय्याने चाचणी केल्यानंतर खूप फरक दिसून आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 एप्रिल 2020)

करोना व्हायरसवर पुण्यात लस बनवण्याची योजना :

 • पुणे स्थित सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीची करोना व्हायरस विरोधात लसची निर्मितीची योजना आहे.
 • सिरम इन्स्टिटय़ूट परवडणाऱ्या दरात लस बनवण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीने आतापर्यंत विविध आजारांवर लस बनवली आहे.
 • Covid-19 विरोधात बनवण्यात येणाऱ्या लसीची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
 • तर सिरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत लस बनवण्याच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे.
 • सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही कंपनी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात लस उपलब्ध करुन देण्यासाठी ओळखली जाते.

पाकिस्तानी क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तीन वर्षांची बंदी :

 • पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते.
 • तर मॅच फिक्सिंगप्रकरणी तो दोषी आढळला असून त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
 • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली आहे. या काळात त्याला क्रिकेटची संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही.

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती :

 • गेल्या काही दिवसांत पुण्यातील प्रामुख्याने शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.
 • पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून, त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तर पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.राज्याच्या मुख्य सचिव कार्यालया मार्फत सोमवार रोजी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.
 • तर अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. तर सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त व कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे.

दिनविशेष :

 • लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी ‘वासुकाका जोशी’ यांचा जन्म 28 एप्रिल 1854 रोजी झाला.
 • 28 एप्रिल 1916 रोजी होम रुल लीगची स्थापना झाली.
 • अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे सन 1920 मध्ये समावेश झाला.
 • इराकी हुकूमशहा आणि इराकचे 5वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म 28 एप्रिल 1937 रोजी झाला.
 • 28 एप्रिल 2001 रोजी डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.