27 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे आज निधन झाले:
माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे आज निधन झाले:

27 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 सप्टेंबर 2020)

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे आज निधन झाले:

  • माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे आज निधन झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
  • याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंतसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
  • जसवंतसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली.
  • अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे.
  • कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा एक डोसही ठरु शकतो पुरेसा:

  • अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये लशी मानवी चाचणीच्या निर्णायक टप्प्यांवर आहेत.
  • अमेरिकेत तर नोव्हेंबरपासन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. ट्रम्प प्रशासनाने तशी तयारीच केली आहे.
  • अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे.
  • जॉन्सन अँड जॉन्सनने करोना विरोधात विकसित केलेल्या लशीच्या पहिल्या फेजच्या चाचणीचे निष्कर्ष आता समोर आले आहेत.
  • प्रायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.
  • जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नाहीत. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

फ्रेंच खुली ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा सप्टेंबरमध्ये खेळण्यात येणार:

  • फ्रेंच खुली ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा यंदा करोनाच्या साथीमुळे मे महिन्याऐवजी सप्टेंबरमध्ये खेळण्यात येणार आहे.
  • मात्र महिना बदलल्याने थंड वातावरण आणि मोजके एक हजार प्रेक्षक हे नवीन चित्र रविवारपासून सुरू होणाऱ्या या लाल मातीवरील स्पर्धेत अनुभवायला मिळणार आहे.
  • ऐतिहासिक 12 वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला 13व्या विजेतेपदासह एकूण 20 ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.
  • स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने विक्रमी 20 ग्रॅँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

दिनविशेष:

  • 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन आहे.
  • सन 1825 मध्ये द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
  • 27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ. केशव हेडगेवार व्दारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना करण्यात आली.
  • भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 मध्ये झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.