27 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

फकिर चंद कोहली
फकिर चंद कोहली

27 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 नोव्हेंबर 2020)

भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’फकिर चंद कोहली यांचं निधन :

  • भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचयाचे असलेले फकिर चंद कोहली यांचं वयाच्या 96 व्या वृद्धापकाळानं निधन झालं.
  • कोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
  • 1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले आणि सिस्टमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली.
  • 1970 मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
  • 1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता. टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला १०० अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली.
  • भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल :

  • ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47 टक्के लोकांचं म्हणणं आहे.
  • सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावलं उचलत असल्याचं या सर्व्हेत सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे.
  • भारतात 46 टक्के लोक आपलं काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे.
  • तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जर असं केलं नाही तर त्याचं काम होतच नाही.
  • भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात 37 टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचं प्रमाणं 30 टक्के असल्याने इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात.
  • आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा दर 10 टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये 12 टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.
  • ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’या नावाने आपला अहवाल सादर केला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच :

  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे.
  • यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण करोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.
  • तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
  • यापूर्वी डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. करोना व्हायरसमुळे यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण 25 मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आलीये.
  • तर, आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक 30 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती, पण आता करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.

भारतीय रेल्वेनं 13 लाख कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट :

  • भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे.
  • तर या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स मॉड्यूलद्वारे त्यांचे पीएफ बॅलेन्स चेक करता येणार आहे. याशिवाय त्यांना अ‍ॅडव्हान्स पीएफसाठी ऑनलाईन अर्जही करता येणार आहे.
  • रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की सुधारित उत्पादकता आणि कर्मचार्‍यांना फायदा मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वेने एचआरएमएस हा एक खास प्रकल्प सुरू केला आहे.
  • रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने, रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस (HRMS) आणि यूझर डेपोची मॉड्यूल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यात कर्मचारी सेल्फ सर्व्हिसचा (ESS) लाभ घेऊ शकतात.

दिनविशेष:

  • इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द.ब. पारसनीस यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1870 मध्ये झाला होता.
  • पॅनासोनिक चे संस्थापक ‘कोनसुके मात्सुशिता‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला होता.
  • विख्यात हिंदी साहित्यिक ‘हरीवंशराय बच्चन‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • अमेरिकन अभिनेता तसेच मार्शल आर्ट तज्ञ ‘ब्रूस ली‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 मध्ये झाला होता.
  • 27 नोव्हेंबर 1978 हा दिवस भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक ‘लक्ष्मीबाई केळकर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
  • सन 1995 मध्ये पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.