27 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

27 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 मे 2022)

कुलपती पद राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री यांना देण्याचा कायदा होणार :

  • बंगालच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
  • तर यासंबंधीचे विधेयक विधानसभेत आणले जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी दिली आहे.
  • तसेच यापुढे सरकारी विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल नसून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असणार आहेत.
  • राज्याचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू यांनी गुरुवारी राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
  • बसू म्हणाले की, हा प्रस्ताव लवकरच पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयकाच्या रूपात मांडला जाईल.
  • राज्यपाल सध्या सरकारी विद्यापीठांचे कुलपती आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 मे 2022)

भारतात सर्वात मोठ्या ‘ड्रोन महोत्सवा’चे आयोजन :

  • नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचे उद्धाटन करण्यात येणार आहे.
  • ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांचा शिडकावा कसा करायचा याचे प्रात्यक्षिक या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे.
  • तर हा महोत्सव दोन दिवसांचा असून तो 27 आणि 28 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
  • या महोत्सवात 70 हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या विविध वापराचे प्रकार दाखवणार आहेत.
  • सरकारी अधिकारी, सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल,खाजगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअप्ससह 1600 हून अधिक प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

आशिया चषक हॉकी स्पर्धात भारताची लक्षवेधी मुसंडी :

  • युवा भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी अखेरच्या साखळी लढतीत इंडोनेशियाचा 16-0 असा धुव्वा उडवत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मुसंडी मारली.
  • भारताने सामन्याच्या अखेरच्या सत्रात सहा गोल नोंदवण्याचा पराक्रम दाखवला.
  • अ-गटातून जपानने 9 गुणांसह गटविजेत्याच्या थाटात पुढील फेरी गाठली.
  • भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खात्यावर समान चार गुण जमा होते; परंतु सरस गोलफरकाआधारे भारताने पाकिस्तानला मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात श्रीशंकरला सुवर्णपदक :

  • भारताचा आघाडीचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने कॅलिथिआ (ग्रीस) येथे झालेल्या 12व्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 8.31 मीटर विक्रमी अंतरासह सुवर्णपदकाची कमाई केली.
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या श्रीशंकरने गेल्या महिन्यात 8.36 मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
  • तर या स्पर्धेत स्वीडनच्या थोबियास माँटलरने रौप्यपदक आणि फ्रान्सच्या ज्युलीस पॉमेरीने कांस्यपदकाची कमाई केली.
  • 10 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत फक्त तीन स्पर्धकांना आठ मीटरचे अंतर ओलांडता आले.

दिनविशेष:

  • 1883 मध्ये अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना 1906 मध्ये झाली.
  • 1951 मध्ये मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे 1935 मध्ये निधन झाले.
  • 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.