27 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
27 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 मे 2020)
मेजर सुमन गावनी यांना युएनचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ पुरस्कार जाहीर :
- भारतीय लष्करातील अधिकारी सुमन गावनी यांना संयुक्त राष्ट्र संघाचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- तर पहिल्यांदा भारतीय सैन्यदुताला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
- तसेच सुमन या संयुक्त राष्ट्र संघाची एक मोहीम अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात होत्या. नुकतीच त्यांनी आपली ही मोहीम पूर्ण केली आहे.
- सुमन गावनी यांच्यासोबत ब्राझिलच्या लष्कराच्या कमांडर कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांनादेखील ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
- तसेच संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांच्या नावाची निवड केली.
- तसंच त्या सर्वांसाठी एक आदर्श ठरतील असंही ते म्हणाले. दरम्यानं भारतानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- मेजर सुमन गावनी यांना 29 मे रोजी पार पडणाऱ्या ऑनलाइन समारंभात या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय नेतृत्वाकडून देण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन :
- देशभरात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांनी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
- 1 मे पासून देशभरात 3026 श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत 40 लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे.
- दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या आहेत. गुजरातमधून 853 ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.
- तर गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नंतर पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक आहे.
- तसेच राज्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे रेल्वे मंत्रालयकडून श्रमिक ट्रेन पुरवल्या जात आहेत. या ट्रेनसाठी येणारा 85 टक्के खर्च रेल्वे उचलत असून उर्वरित खर्च राज्य सरकारं उचलत आहेत.
शाळांसंबधी केंद्र सरकारने आखली महत्त्वाची योजना :
- केंद्र सरकार झोन प्रमाणे शाळा पुन्हा सुरु कऱण्याचा विचार करत आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम शाळा सुरु करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे.
- तर महत्त्वाचं म्हणजे शाळेत सातवी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांनाच बोलावलं जाऊ शकतं. प्राथमिक वर्गाच्या (पहिली ते सातवी) विद्यार्थ्यांना जोपर्यंत शाळा पूर्णपणे सुरु होत नाहीत तोपर्यंत घरीच थांबण्यास सांगितलं जाऊ शकतं.
- करोनाच्या पार्श्वभुमीवर 16 मार्चपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने सर्व पालकांना शाळा पुन्हा कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे.
- तसेच रिपोर्टनुसार, शाळा सुरु होण्यासाठी तारीख ठरवण्यात आली असून जुलै महिन्यात विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो.
- तर 30 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत शाळा सुरु कऱण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे शाळा दोन शिफ्टमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष:
- 1883 मध्ये अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना 1906 मध्ये झाली.
- 1951 मध्ये मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे 1935 मध्ये निधन झाले.
- 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले.