27 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 May 2019 Current Affairs In Marathi

27 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 मे 2019)

देशातील 25 राज्यांना महिना 1 कोटी दंड :

  • देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना 30 एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना 1 कोटी रूपये पर्यावरण भरपाई द्यावी लागणार आहे.
  • तसेच 30 एप्रिलपर्यंत राज्यांनी कृती योजना सादर केल्या नाहीत, तर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळास दरमहा 1 कोटी रूपये भरपाई द्यावी, असे राष्ट्रीय हरित लवादाने असे बजावले होते.
  • तर याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अतिरिक्त संचालक एस.के. निगम यांनी सांगितले, की राज्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे पालन केलेले नसून यात केवळ दंडच नव्हे तर तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
  • पर्यावरण मंत्रालयाने याबाबत जी जनजागृती करायला पाहिजे होती ती केलेली नाही. प्लास्टिक कचरा वेगळा काढण्याच्या सूचना व इतर बाबतीत राज्यातील अधिकाऱ्यांचेच प्रबोधन केलेले नाही. हरित लवादाच्या आदेशाचे पालन झाले नाही, तर 1 मे 2019 पासून दर महिन्याला 1 कोटी रूपये याप्रमाणे दंड आकारण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मे 2019)

पेरूला भूकंपाचा धक्का :

  • अमेरिकी देश पेरुच्या उत्तर मध्य भागाला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.
  • अमेरिकी भुवैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजाता 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का जाणवला. काही तज्ज्ञाच्या मते या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका वाढला आहे.
  • तसेच गेल्या सात दिवसांत पेरूमध्ये हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे.
  • तर 25 मे रोजी सायंकाळी सहा वाजून 26 मिनिटांनी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 4.78 इतकी नोंदवली गेली होती. तर 21 मे राजी झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.1 रेश्टर स्केल नोंदवली आहे.

जीएसटी रिफंडसाठी एकच प्राधिकरण निर्माण करणार :

  • वस्तू व सेवाकराच्या परताव्यांचे (रिफंड) संपूर्ण कामकाज एकाच प्राधिकरणामार्फत करण्याची वित्त मंत्रालयाची योजना असून, येत्या ऑगस्टपर्यंत त्यासाठीची आवश्यक व्यवस्था निर्माण केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
  • तर सध्याच्या व्यवस्थेत केंद्र आणि राज्य सरकारांचे कर परतावे वेगवेगळे दिले जातात. जीएसटी व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी दोन्ही परतावे एका संस्थेमार्फत देण्याची योजना आहे.
  • तसेच ऑगस्टपर्यंत त्यासाठीचे एकल प्राधिकरण (सिंगल अ‍ॅथॉरिटी) निर्माण केले जाईल.
  • महसूल विभागामार्फत आरेखित करण्यात आलेल्या नव्या व्यवस्थेत करदात्यांना केंद्र आणि राज्य सरकारांचे कर परतावे एकाच ठिकाणाहून मिळतील. केंद्र आणि राज्य सरकार या परताव्यांच्या पैशांचे आदान-प्रदान आपल्या प्रशासकीय पातळीवर करून घेतील.
  • करदात्यांना त्यासाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज राहणार नाही. सक्षम अधिकाऱ्यांकडून परताव्यांना मंजुरी मिळविण्याचे काम फक्त करदात्यांना करावे लागेल.

अपूर्वी चंदेलाने साधला सुवर्णवेध :

  • भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या वर्षातील तिसऱ्या आयएसएसएफ रायफल पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत चुरशीच्या लढतीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • तर जयपूरच्या या नेमबाजाने अंतिम फेरीमध्ये एकूण 251 गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ 205.8 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनची जु होंग 229.4 गुणांसह तिसर्या क्रमांकावर राहिली.
  • लॉरा व इस्टर यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान पटकावले. याआधीच भारताकडून अपूर्वी चंदेला, सौरभ तिवारी, अभिषेक वर्मा, दिव्यांशसिंग पवार यांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला.

दिनविशेष:

  • 1883 मध्ये अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना 1906 मध्ये झाली.
  • 1951 मध्ये मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे 1935 मध्ये निधन झाले.
  • 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. nitin venkat udamale says

    how can I download pdf because there is not option

Leave A Reply

Your email address will not be published.