27 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जी-7
जी-7

27 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 जून 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेत घेणार सहभाग :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर आहेत.
 • जर्मनीमधील आयोजित जी-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
 • जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांवर आपले विचार मांडण्याची शक्यता आहे.
 • या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या इतर लोकशाही देशांनाही या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
 • जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी देशांतील काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जून 2022)

भारतातील कायदेशीर स्थिती अमेरिकेपेक्षा उत्तम :

 • गर्भपात बेकायदा ठरवण्यात आल्याने असुरक्षित आणि बेकायदेशीर गर्भपात होणे, त्यासाठी अन्य देशांत जाणे, मुले जन्माला आल्यावर ती दत्तक देणे किंवा अनाथाश्रमात पाठवणे या घटनांमध्ये अमेरिकेत वाढ होऊ शकेल, अशी भीती या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी व्यक्त करत आहेत.
 • तर प्राप्त परिस्थितीत गर्भपातासंदर्भात भारतीय कायदा हा अमेरिकेतील कायद्यापेक्षा अधिक चांगला आहे, अशीही प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 • मूल हवे की नको या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा स्त्रियांचाच असायला हवा, असे स्पष्ट करणारा कायदा 1973 मध्ये अमेरिकेत अस्तित्वात आला.
 • मात्र आता 50 वर्षांनंतर 2022 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचा हा अधिकार बहुमताने रद्द ठरविल्यामुळे स्त्रियांवर अवांच्छित गर्भारपण लादले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेत व्यक्त होत आहे.

भारताचा आयर्लंडवर शानदार विजय :

 • भारतीय टी 20 संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे.
 • भारत आणि यजमान संघात दोन सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जात आहे.
 • यातील पहिला सामना २६ जून डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर झाला.
 • भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला.
 • या विजयामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
 • आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

दिनविशेष :

 • काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म 27 जून 1864 मध्ये झाला.
 • दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म 27 जून 1875 मध्ये झाला.
 • अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र 27 जून 1954 रोजी मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.
 • अर्थतज्ज्ञ द.रा. पेंडसे यांना सन 1996 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान प्राप्त झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जून 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.