Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

27 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 जून 2020)

लिव्हरपूल ला विजेतेपदासाठी तब्बल 30 वर्षे प्रतीक्षा पाहावी लागली:

 • 1970-80च्या दशकात इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या लिव्हरपूलसारख्या अव्वल क्लबला विजेतेपदासाठी तब्बल 30 वर्षे प्रतीक्षा पाहावी लागली.
 • चेल्सीने दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर सिटीला 2-1 असे पराभूत के ल्यामुळे लिव्हरपूलने 1990 नंतर प्रथमच इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद संपादन केले.
 • सामाजिक अंतराचे नियम आणि गर्दीसंबंधातील कायदे असतानाही अ‍ॅनफिल्ड स्टेडियमबाहेर एकत्र जमून लिव्हरपूलच्या चाहत्यांनी विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला.
 • सात सामने राखून प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवणारा लिव्हरपूल हा पहिला संघ ठरला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जून 2020)

S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार- रशिया:

 • सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार आहे.
 • दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांशी चर्चा केली होती.
 • तर पहिल्या टप्प्यातील S-400 देण्यास रशियानं सहमती दर्शवली आहे. यापूर्वी हे अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल 2021 पर्यंत भारताला देण्यात येणार होते.
 • 2024 पर्यंत रशिया भारताला दरवर्षी एक मिळणार S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम देणार आहे

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के आहे

 • देशात 17 हजार 296, तर राज्यात पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. देशातील रुग्णसंख्या 4 लाख 90 हजार 401 झाली आहे.
 • गेल्या 24 तासांमध्ये 407 मृत्यू झाले. त्यामुळे देशभरातील मृतांचा आकडा 15 हजार 301 झाला आहे.
 • राज्यात गेल्या 24 तासांत 84 जणांचा मृत्यू झाला.
 • त्यामुळे करोना बळींची संख्या 7106 झाली आहे. 2362 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के आहे.

दिनविशेष :

 • सन 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपडी निवड झाली. हा एक विक्रमच आहे.
 • द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने सन 1999 मध्ये मंजूर केला होता.
 • 27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जून 2020)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World