27 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 July 2019 Current Affairs In Marathi

27 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 जुलै 2019)

संसदीय समित्यांची नियुक्ती :

  • संसदेच्या विविध समित्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून अत्यंत महत्त्वाची वित्तीय समिती लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संरक्षण, रेल्वे, कररचना, नागरी विकास तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या ताळेबंदावरील महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालाची छाननी करण्याची जबाबदारी लोकलेखा समितीकडे असते.
  • तर गेल्या वर्षी राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भातील कॅगचा अहवाल लोकलेखा समितीकडे दिल्याचा दावा केंद्र सरकारने केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
  • तसेच केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याचे काम लोकलेखा समिती अप्रत्यक्षपणे करत असते. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडे या समितीचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र गेल्या लोकसभेप्रमाणे नव्या लोकसभेतही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला संख्याबळाअभावी मिळालेले नाही.
  • विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाचे गटनेते या नात्याने अधीर रंजन चौधरी यांच्याकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या समितीतील 22 सदस्यांपैकी सात राज्यसभेचे सदस्य आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जुलै 2019)

भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात :

  • विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठीच्या मुलाखती ऑगस्टच्या मध्यावर होणार आहेत.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. कपिल यांच्यासह या समितीवर माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे.
  • तर त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती पुरुषांच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. ऑगस्ट महिन्यात मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अरुण, बांगर आणि श्रीधरन यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विविध प्रशिक्षकपदांसाठी अर्ज मागवले असून, प्राथमिक पडताळणीनंतर मुलाखत प्रक्रिया पार पडेल.

पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :

  • पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. मात्र पाकिस्तानसाठी मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये आमीर खेळणार आहे.
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आमीरने आपला निर्णय कळवला आहे.
  • इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला होता, मात्र आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून देण्यामध्ये तो अपयशी ठरला.
  • जुलै 2009 साली श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटी सामन्यात आमीरने पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
  • त्याने 36 कसोटी सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं, या सामन्यांमध्ये आमीरने 30 च्या सरासरीने 119 बळी घेतले.

येडियुरप्पाच पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री :

  • भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना शपथ दिली. येडियुरप्पा यांना सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
  • तर एकट्या येडियुरप्पा यांचाच शपथविधी पार पडला. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरच अन्य मंत्र्यांना शपथ देण्यात येईल. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करून मगच मंत्रिमंडळ ठरवू, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.
  • तसेच येडियुरप्पा यांनी 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना सत्तास्थापनेचा दावा करताना सांगितले.

दिनविशेष :

  • सन 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपडी निवड झाली. हा एक विक्रमच आहे.
  • द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने सन 1999 मध्ये मंजूर केला होता.
  • 27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2019)

You might also like
1 Comment
  1. Kokare malati says

    I B.com nice work Mam,

Leave A Reply

Your email address will not be published.