27 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

 महाराष्ट्राचा चित्ररथ
महाराष्ट्राचा चित्ररथ

27 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 जानेवारी 2022)

राष्ट्रपतींचा अंगरक्षक ‘विराट’निवृत्त :

  • राजपथावर 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच राष्ट्रपतींचे अंगरक्षक (पीबीजी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुन्हा राष्ट्रपती भवनात घेऊन गेले.
  • 15 जानेवारीला आर्मी डेच्या पूर्वसंध्येला विराटला आर्मी स्टाफचे चीफ कमंडेशन देण्यात आले.
  • तर असाधारण सेवेसाठी आणि क्षमतेबद्दल प्रशंसा मिळवणारा विराट हा पहिला घोडा आहे.
  • प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या समारोपानंतर पीबीजीने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • तसेच विराटने 13 वेळा या स्पर्धेत यशस्वी सहभाग घेतला आहे.
  • भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या ताफ्यातील खास घोडा ‘विराट’ला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विशेष सन्मान दिला आहे.
  • विराटला त्याच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमंडेशन कार्ड देण्यात आले आहे.
  • राष्ट्रपतींच्या अंगरक्षक ताफ्यातील विराट हा पहिला घोडा आहे ज्याला हे सन्मानपत्र मिळाले आहे.

राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला खास :

  • संपूर्ण देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला आहे.
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
  • तर या संचलनात जवळपास 12 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे 21 चित्ररथ सहभागी झाले आहेत.
  • तर यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आला होता.
  • तसेच या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला आहे.
  • यंदाच्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला.

मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित झाले ASI बाबूराम :

  • भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू आणि काश्मीर पोलीस विभागातील अधिकारी (एएसआय) बाबूराम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केलं.
  • एएसआय बाबूराम यांची पत्नी रीना रानी आणि मुलगा मानिक यांनी राष्ट्रपतींनी दिलेला सन्मान स्विकारला.
  • एका चकमकीत बाबूराम यांनी स्वतः जखमी होऊनही तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच मोठ्या धाडस आणि पराक्रमाच्या बळावर आपल्या सहकाऱ्यांना वाचवलं होतं.
  • एएसआय बाबूराम आपल्या सेवेत 14 दहशतवाद विरोधी चकमकींचा भाग होते.
  • तसेच यात त्यांनी 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

पहिल्या महिला फायटर जेट पायलटचा अनोखा सन्मान :

  • राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला वैमानिक शिवांगी सिंह बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाचा भाग होत्या.
  • शिवांगी या भावना कंठ नंतर भारतीय वायूदलाच्या चित्ररथाचा भाग असणारी दुसऱ्या महिला फायटर जेट पायलट आहे.
  • तर गेल्यावर्षी चित्ररथाचा भाग असणाऱ्या भावना कंठ पहिल्या महिला फायटर जेट पायलट होत्या.
  • वाराणसीच्या रहिवासी असलेल्या शिवांगी सिंह 2017 मध्ये भारतीय वायूदलात रुजू झाल्या होत्या.
  • तर त्यांना IAF च्या महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
  • राफेल लढाऊ विमान उडवण्यापूर्वी त्या मिग-21 बायसन विमान उडवत होत्या.
  • शिवांगी पंजाबमधील अंबाला येथील IAF च्या गोल्डन एरो स्क्वॉड्रनचा देखील एक भाग आहे.

आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर :

  • ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा टॉप-10 मध्ये कायम आहेत.
  • फलंदाजांच्या क्रमवारीत विराट दुसऱ्या तर रोहित तिसऱ्या स्थानावर आहे.
  • तर दुसरीकडे, जसप्रीत बुमराह गोलंदाजांमध्ये सातव्या, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे.
  • भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे.
  • क्विंटन डी कॉक आणि रूसी व्हॅन डर डुसेन यांनी फलंदाजांच्या टॉप-10 क्रमवारीत प्रवेश केला आहे.

दिनविशेष :

  • 1967 : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
  • 1938 :जगाती ल सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (53.900 किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
  • 2009 : भारताचे 8 वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.