27 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

27 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2020)

मध्य प्रदेश कॅबिनेटनं मंजूर केलं नवं विधेयक :

 • मध्य प्रदेश कॅबिनेटने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केलं आहे.
 • तर उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकार नंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील लव्ह जिहाद विरोधी कडक कायदा बनवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात आलं आहे.
 • तसेच यामध्ये अल्पवयीन व दलितांच्या जबरदस्ती धर्मांतराबद्दल शिक्षेची तरतूद आहे.
 • तर या विधेयकामध्य कुणाचे जबरदस्ती धर्मांतरण केल्याबद्दल 1 ते 5 वर्षे तरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे व कमीत कमी 25 हजार रुपये दंड आकरला जाऊ शकतो.
 • या कायद्यांतर्गत कोणत्याही अल्पवयीन, महिला, दलित व आदिवासींचे जबरदस्ती धर्मांतर केल्याबद्दल 2 ते 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते व कमीत कमी 50 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2020)

2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी :

 • भारतीय अर्थव्यवस्था ही सन 2025 पर्यंत जगातील पाचवी तर सन 2030 मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनं वर्तवलं आहे. या संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
 • भारत सन 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन 2020 मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.
 • भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये 9 टक्के आणि 2022 मध्ये 7 टक्क्यांनी वाढेल असंही सीईबीआरने म्हटलं आहे.
 • आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन 2035 मध्ये जीडीपीची वाढ 5.8 टक्के राहिल.
 • तर यादरम्यान भारत सन 2030 मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

ॲमेझॉन करणार मराठीचाही समावेश :

 • ‘मराठी नाही तर ॲमेझॉन नाही’अशी आक्रमक भूमिका घेत ॲमेझॉनवर मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी केली होती.
 • तर या वरून मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईत ॲमेझॉनचे कार्यालय व वेअरहाउसवर धडक देत तोडफोड केली.
 • मनसेची मागणी मान्य करत येत्या सात दिवसांत ॲमेझॉनवर मराठीचा समावेश करू, असे आश्वासन ॲमेझॉनने दिले आहे.

दिनविशेष:

 • उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 मध्ये आग्रा येथे जन्म झाला होता.
 • रेबीज किंवा हाइड्रोंफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ ‘लुई पाश्चार‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 मध्ये झाला होता.
 • विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री ‘पंजाबराव देशमुख‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 मध्ये झाला होता.
 • सन 1945 मध्ये 28 देशांनी एकत्रिक जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.