26 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
26 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2020)
संडे टाइम्स’चे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन:
- संडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.
- ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मुद्रित माध्यमांचा खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- ब्रिटिश अमेरिकी पत्रकार असलेल्या इव्हान्स यांनी थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामांवर वृत्तमालिका चालविली होती.
- नियतकालिकाचे संस्थापक, पुस्तक प्रकाशक, लेखक व अगदी शेवटी रॉयटर्सचे मानद संपादक अशा बहुविध भूमिकांतून त्यांनी काम केले होते.
- ते 14 वर्षे संडे टाईम्सचे संपादक होते. 2003 मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ म्हणजे ‘सर’ हा किताब पत्रकारितेतील सेवेसाठी देण्यात आला होता.
- काही काळ ते काँड नॅस्ट ट्रॅव्हलर नियतकालिकाचे संपादक होते. नंतर रँडम हाऊस या प्रकाशन कंपनीचे अध्यक्ष बनले.
- प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नालिझम रिव्ह्य़ू यांच्या जनमत चाचणीत ते सर्वात महान पत्रकार ठरले होते.
Must Read (नक्की वाचा):
मेड इन इंडिया ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी ऑक्टोबरपासून सुरु होणार:
- करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी लवकरच सुरु होणार आहे.
- ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी जाहीर केले.
- भारत बायोटेकने इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळून कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती केली आहे.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, उत्तर प्रदेशात 61,698 करोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. तीन लाख दोन हजार 689 रुग्ण करोनानुक्त झाले आहेत, तर 5,299 मृत्यू झाले आहेत.
बायर्न म्युनिकला जेतेपद – यूएफा सुपर चषक फुटबॉल :
- जावी मार्टिनेझच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकने सेव्हियाचा 2-1 असा पराभव करत यूएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
- मार्टिनेझने 104व्या मिनिटाला गोल करत बायर्नच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. तब्बल सात वर्षांनंतर बायर्नने सुपर चषकाचे जेतेपद पटकावले.
- डेव्हिड अलाबाने मारलेला फटका सेव्हियाचा गोलरक्षक यासिन बोऊनोऊ याने परतवून लावल्यानंतर मार्टिनेझने परतीच्या फटक्यावर गोल लगावला. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.
दिनविशेष:
- मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म 26 सप्टेंबर 1918 मध्ये झाला.
- भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
- भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 मध्ये झाला.
- 1990 या वर्षी रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे 21 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.