26 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 October 2018 Current Affairs In Marathi

26 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2018)

रद्दीच्या मोबदल्यात मिळणार नव्या वह्या:

  • शालेय विद्यार्थ्यांना रद्दीच्या मोबदल्यात लवकरच कोऱ्या करकरीत वह्या मिळणार आहेत. ही संधी जळगावातील नमोआनंद अपसायक्लर्स प्रा.लि. या स्टार्टअप कंपनी व शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात या दोघांमध्ये राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार झाला.
  • वृक्षतोड टळावी व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी जळगावातील कोठारी परिवाराने हा उपक्रम हाती घेतला.
  • जितेंद्र व आनंद कोठारी यांनी नमोआनंदच्या माध्यामातून जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात 36 दुकाने सुरू करून रद्दीच्या मोबदल्यात वह्या उपलब्ध करून दिल्या. दीड वर्षांपूर्वी ही योजना पुणे येथे महापालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर यशस्वीपणे राबविण्यात आली होती.
  • पर्यावरण रक्षणासाठी राज्यातील शाळांमध्ये रद्दीच्या मोबदल्यात वह्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागासोबत करार झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑक्टोबर 2018)

‘सीबीआय’ आलोक वर्मा प्रकरणाचा गुंता वाढला:

  • केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदावरून आलोक वर्मा यांना हटविले गेल्यानंतर सीबीआय प्रकरणातील गुंता वाढतच चालला आहे. या प्रकरणी सरकारवर टीका सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असल्याने सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. Alok Varma
  • सीबीआय संचालकपदी वर्मा हेच कायम आहेत, फक्त त्यांचे अधिकार तात्पुरते काढले आहेत, असा खुलासा सरकारला करावा लागला आहे. त्याचवेळी सीबीआय संचालकांची नियुक्तीच नव्हे, तर त्यांचे अधिकार कमी करण्यासाठी वा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासाठी विशेष समितीची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. ती घेतली नसल्याने ही संपूर्ण कारवाईच बेकायदेशीर आहे, असे पत्र या समितीचे सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.
  • तर या समितीती पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते या न्यायाने खरगे हे तिघे सदस्य आहेत. त्यामुळे या समितीची परवानगी न घेता अशी कारवाई करण्याचा अधिकार ना तुम्हाला आहे ना केंद्रीय दक्षता आयोगाला, असे खरगे यांनी पत्राद्वारे सुनावले आहे.

पाकिस्तानच्या हिंदूंना भारतीयत्वासाठी अर्ज करता येणार:

  • पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदू, जैन, शीख, बौद्ध आणि ख्रिस्ती अल्पसंख्याकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली. तिन्ही देशांमधील अल्पसंख्याकांना मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह देशातील 16 जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार आहे.
  • केंद्र सरकारने सहा दशकं जुन्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा केली असून सुधारित कायद्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन शेजारी राष्ट्रांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील निकषांत बदल करण्यात आले आहे. यापूर्वी वास्तव्याची अट किमान 12 वर्षे होती. ती अट आता सहा वर्षांवर आणली आहे.
  • अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्वासाठी देशातील 16 जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे यांच्यासह अहमदाबाद, गांधीनगर, कच्छ, भोपाळ, इंदूर, जोधपूर, जैसलमेर, जयपूर, लखनौ, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या 16 जिल्हाधिकारी कार्यालयांचा समावेश आहे.
  • तसेच या 16 जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी राहणाऱ्यांसाठी राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या गृह सचिवांचे अधिकाऱ वाढवण्यात आले आहे.

डॉ. अभय अष्टेकरांचा आइन्स्टाइन पुरस्काराने सन्मान:

  • कृष्णविवरांमधील टक्कर यांसारख्या जटिल भौतिक घटनांचा अभ्यास करण्याचे समीकरण तयार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
  • अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या (एपीएस) वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. एपीएस ही भौतिक शास्त्रज्ञांची जगातील दुसऱ्या क्रमांकांची संस्था आहे. अष्टेकर यांना प्रदान केलेल्या पुरस्काराचे स्वरूप 10 हजार डॉलर असे आहे.
  • अल्बर्ट आइन्स्टाइनने काही दशकांपूर्वी वर्तवलेल्या गुरुत्वाकर्षणासंबंधीची भविष्यवाणी समजून घेण्यासाठी अष्टेकर यांनी 1987 मध्ये गणितीय समीकरण मांडले. त्यालाच लूप क्वॉंटम ग्रॅव्हिटी सिद्धान्त किंवा अष्टेकर व्हेरीअबल्स असे म्हटले जाते. Dr Abhay Astekar
  • जगातील अनेक शास्त्रज्ञ या सिद्धांतावर आधारित संशोधन करीत आहेत. अष्टेकर यांनी क्वॉंटम फिजिक्स आणि सामान्य सापेक्षता यांच्या एकत्रीकरणातून लूप क्वॉंटम ग्रॅव्हिटी हा सिद्धांत मांडला.
  • हा सिद्धांत आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताचा आज महत्त्वाचा घटक आहे. कृष्णविवरांमधील टक्कर यांसारख्या प्रचंड घटना उलगडून सांगण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग करण्यात येत आहे.

2020 पर्यंत प्रत्येकाच्या हातात 4जी असणार:

  • येत्या काही वर्षांमध्ये जिओच्या फायबर आधारित ब्रॉडबँडमुळे मोबाइल डेटाच्या वापरामध्ये भारताचा समावेश जगातील पहिल्या तीन देशांमध्ये असेल.
  • मोबाइल डेटा सर्वत्र उपलब्ध असणं हे भारताचे सर्वात मोठे बलस्थान असेल. 2020 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या हातात 4जी मोबाइल असेल. प्रत्येकाच्या हातात डेटा पोहोचेल, तेव्हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा जन्म होऊ शकतो.
  • तर यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि देशातील परिस्थिती बदलेल. रिलायंस जिओ 5 जी साठी सज्ज आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी म्हणाले आहेत.

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पूजा धांडाला कांस्यपदक:

  • भारताची अव्वल कुस्तीपटू पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.
  • महिलांच्या 57 किलो वजनी गटात नॉर्वेच्या ग्रेस बुलेन हिला 10-7 असे नमवून पूजाने कांस्यपदकावर नाव कोरले.
  • जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी ती भारताची तिसरी महिला कुस्तीपटू ठरली आहे. याआधी अलका तोमरने 2006 मध्ये तर गीता फोगट हिने 2012 मध्ये कांस्यपदक पटकावले होते.
  • ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिला 62 किलो वजनी गटाच्या रिपिचेज फेरीत हंगेरीच्या मारियाना सास्तिन हिच्याकडून 2-3 असे पराभूत व्हावे लागले.

दिनविशेष:

  • 26 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन म्हणून पाळला जातो.
  • संत नामदेव यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला.
  • जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन सन 1863 रोजी लंडनमध्ये सुरु झाले.
  • सन 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही.व्ही. रानडे यांना सन 1999 मध्ये केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.