26 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 March 2019 Current Affairs In Marathi

26 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 मार्च 2019)

पाकिस्तानी रडारच्या हालचालींची मिळणार अचूक माहिती :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो येत्या एक एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइट एमिसॅटचे प्रक्षेपण करणार आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी अत्याधुनिक एमिसॅट उपग्रहाची निर्मिती केली आहे.
  • तर भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपग्रह अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. एमिसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
  • तसेच युद्धकाळात हा उपग्रह महत्वपूर्ण ठरेल. सीमेवर तैनात केलेले सेन्सर्स, शत्रूच्या प्रदेशातील रडारच्या हालचाली, त्या प्रदेशाची माहिती आणि नेमकी तिथे किती कम्युनिकेशन उपकरणे सुरु आहेत याची इत्यंभूत माहिती मिळेल असे डीआरडीओचे माजी वैज्ञानिक रवी गुप्ता यांनी दिली आहे.
  • 436 किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे.
  • सुरक्षा यंत्रणा ड्रोन, एअरोस्टॅट आणि फुग्यांच्या माध्यमातून शत्रूची शस्त्रास्त्रे आणि हालचालींवर लक्ष ठेवतात. पण त्याला एक मर्यादा आहे.
  • तसेच इलेक्ट्रॉनिक सॅटेलाइटमुळे त्या भागात मोबाइल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे.
  • एमिसॅटच्या आधी इस्त्रोने 24 जानेवारीला डीआरडीओचा मायक्रोसॅट-आर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 मार्च 2019)

‘तेजस’मध्ये मलेशियाला रस :

  • भारताच्या ‘तेजस’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे.
  • ‘तेजस’ हे भारताने विकसित केलेले स्वदेशी बनवाटीचे हलके लढाऊ विमान आहे. तसेच मलेशियामध्ये होणाऱ्या एअर शो साठी अन्य 50 विमानांसोबत तेजस क्वालालंपुरमध्ये दाखल झाले आहे.
  • तर दोन तेजस विमाने मलेशियातील एअर शो मध्ये सहभागी होणार असून आपले कौशल्य सादर करणार आहेत.
  • मलेशियन सरकारनेच जेएफ-17, एफ/ए-50 या फायटर विमानांसह तेजसची निवड केली आहे असे क्वालालंपुरमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अनिरुद्ध चौहान यांनी सांगितले आहे. तर जेएफ-17 हे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेले तर एफ/ए-50 हे दक्षिण कोरियाने विकसित केलेले फायटर विमान आहे.

शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स देशसेवेत दाखल :

  • अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स देशसेवेत कालपासून दाखल झाले.
  • तसेच चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे.
  • तर ही चार अॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहेत. या विमानांची पहिली खेप चंदीगडच्या 3-BRD येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे.
  • अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी 15 हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.
  • तसेच अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे.

आण्विक, रासायनिक, जैविक हल्याला तोंड देण्यासाठी नौसेनिकांना मिळणार प्रशिक्षण :

  • आजच्या आधूनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. देशाच्या सामुद्र किना-यांचे रक्षण करणा-या युद्धनौकांनाही आण्विक, रासायनिक आणि जैविक हल्याचा धोका आहे. अशा प्रकारचा हल्ला झाल्यास निर्माण होणा-या परिस्थीतीला तोंड देण्यासाठी आणि हल्याची तिव्रता कमी करण्यासाठी नौसेनीक तसेच अधिका-यांना आधूनिक सिम्यूलेटरद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • लोणावळा येथील नौदलाचे प्रशिक्षण केद्र असलेल्या आयएनएस शिवाजी येथे न्युक्लीअर, बायोलॉजीकल आणि केमीकल वॉरफेर हे नवे केंद्र सुरू करण्यात आले असून संस्थेच्या हिरकहोत्सवी वर्षानिमित्त या नव्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनिल लांबा यांच्या हस्ते करण्यात आले.
  • तर हिंदी महासागरात भारतीय नौसेनेचा मोठा दबदबा आहे. समुद्रात देशाची सेवा करणा-या नौकांनाही आण्विक, रासायनिक आणि जैविक शस्त्राद्वारे हल्ला होण्याचा धोका असतो. ही घातक शस्त्रे मोठ्या प्रमाणात माणवी आरोग्यावर परिणाम करतात. देशात नौसेनिकांना या प्रकारचे प्रशिक्षण हे केवळ लेखी स्वरूपात मिळत होते. मात्र, गोवा शिपयार्ड तर्फे ‘अभेद्य’ या नव्या सिम्युलेटरची निर्मिती करण्यात आली असून हे सिम्युलेटर लोणावळा येथील आएएनएस शिवाजी या ठिकाणी कार्यान्वीत करण्यात आले आहे.
  • तसेच या द्वारे याप्रकारच्या हल्यांना तोंड अधिकारी आणि नौसिकांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. नौदलातील प्रत्येकाला याचे प्रशिक्षण हे अनिवार्य असून आतापर्यंत सात हजार सैनिकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या सिम्युलेटरचे प्रात्यक्षिक यावेळी नौदलाच्या अधिका-यांनी दाखवीले आहे.

दिनविशेष :

  • 26 जानेवारी 1552 मध्ये गुरु अमर दास शिखांचे तिसरे गुरु बनले.
  • इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह 26 जानेवारी 1942 मध्ये झाला.
  • 26 जानेवारी 2013 मध्ये त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 मार्च 2019)

You might also like
2 Comments
  1. Kalpana aher says

    Super

  2. Roshan Satyanarayana pal says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.