26 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

26 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 जानेवारी 2022)

महाराष्ट्रातील 51 जणांना केंद्राकडून पोलीस पदक :

 • महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना पोलीस पदक हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • तर यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,सात ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
 • प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते.
 • तसेच यावर्षी एकूण 939 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), 189 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत.
 • देशातील 88 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी, कर्मचा-यांचा समावेश आहे.

पद्म पुरस्कारांची घोषणा :

 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
 • तर एकूण 128 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
 • यामध्ये प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेश्याम खेमका (मरणोत्तर) पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे.
 • तर, सायरस पुनावाला (व्यापर आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापर आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • याशिवाय बालाजी तांबे, विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

राजपथावरील संचलनात दिसणार सांस्कृतिक नृत्य:

 • आज संपूर्ण देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.
 • दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच 23 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे.
 • तर हा प्रजासत्ताक दिन यासाठीदेखील विशेष आहे कारण, इतिहासात प्रथमच या संचलनात 75 विमानांचा फ्लाय पास्ट होणार आहे.
 • तसंच 75 मीटर लांबीच्या 10 स्क्रोलचे (सांस्कृतिक नृत्य) प्रदर्शन यासारखे कार्यक्रम होणार आहेत.

भारताची शफाली वर्मा पुन्हा नंबर वन :

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत भारताची युवा महिला फलंदाज आणि ‘लेडी सेहवाग’ अशी ओळख असलेल्या शफाली वर्माला फायदा झाला आहे.
 • शफाली पुन्हा एकदा टी-20 मध्ये जगातील नंबर वन महिला फलंदाज बनली आहे.
 • तर श्रीलंकेची फलंदाज चमारी अटापट्टूनेही फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.
 • ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
 • तर त्याच मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर तिने 754 रेटिंग गुणांसह पहिले स्थान पटकावले.

दिनविशेष:

 • 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 • 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारचा कायदा 1935 बदलून भारत संविधान लागू झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारला आणि 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही सरकार व्यवस्था येऊन भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश म्हणून जन्माला आला.
 • सन 1876 मध्ये मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
 • सन 1949 मध्ये भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
 • सन 1950 या वर्षी भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
 • एच.जे. कनिया यांनी सन 1950 मध्ये भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • सन 1965 मध्ये भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
 • महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सन 1978 मध्ये सुरू झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.