26 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 January 2019 Current Affairs In Marathi

26 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 जानेवारी 2019)

मुखर्जी, देशमुख आणि हजारिका यांना भारतरत्न जाहीर:

 • प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न सन्मानासाठी निवड झाली आहे. Bharatratna
 • यापैकी नानाजी देशमुख व भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. यंदा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ दिले जाईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती, पण तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांचा सन्मान करण्याचे केंद्र सरकारने ठरविले.
 • नानाजी देशमुख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील कडोली गावी झाला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात गेले आणि तिथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिट्स पिलानीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
 • महाविद्यालयात असताना राष्ट्रीयस्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. वयाच्या 60व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकुटमध्ये जाऊ न आदिवासी व मागास समाजात काम सुरू केले. त्यांचे निधन 93व्या वर्षी 2010 मध्ये झाले.
 • तर आसाममध्ये 1926 साली जन्मलेल्या भूपेन हजारिका यांनी आसामीच नव्हे, तर अनेक बंगाली व हिंदी चित्रपटांना व हजारो गीतांना संगीत दिले. त्यांच्या सर्व गीतांवर लोकसंगीताचा मोठा प्रभाव होता.
 • ते स्वत: गीतकार, गायक, दिग्दर्शकही होते. त्यांना संगीतासाठीचे अनेक पुरस्कार मिळाले असून, ‘पद्मभूषण’ व ‘पद्मविभूषण’ या पुरस्कारानेही यापूर्वी सन्मानित करण्यात आले होते. भूपेन हजारिका यांची ‘दिल हूं हूं करे’ ‘गंगा बहती है क्यूं’ आदी गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत. त्यांचे 2011 साली मुंबईत निधन झाले.
 • प्रणव मुखर्जी यांची माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते म्हणून ओळख सर्वांना आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळापासून अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. ते 2012 ते 2017 या काळात भारताचे राष्ट्रपती होते.
 • राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर ते रा. स्व. संघाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते. तिथेही मुखर्जी यांनी आपले म्हणणे संघ कार्यकर्त्यांसमोर ठामपणे मांडले होते.

महाराष्ट्रामधील 11 जण ‘पद्म’ पुरस्काराचे मानकरी:

 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लार्सन अँड टुब्रोचे अनिलकुमार नाईक, प्रख्यात नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, आदिवासी भागात आरोग्यसेवेचे काम करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, लातूरमध्ये वैद्यकीस सेवा देणारे डॉ. अशोक कुकडे गायक-संगीतकार शेकर महादेवन या 11 जणांचा समावेश आहे.
 • प्रख्यात लोकगायिका तीजनबाई यांना ‘पद्मविभूषण’ तर नामवंत पत्रकार स्व. कुलदीप नय्यर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हुकूमदेव यादव हेही यंदा ‘पद्मभूषण’चे मानकरी ठरले आहेत.
 • याखेरीज अलीकडेच निधन झालेले अभिनेते कादर खान, क्रिकेटपटू गौतम गंभीर, नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा आणि माजी अधिकारी एस. जयशंकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व डॉ. अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण किताबाने तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • पद्मश्री किताब मिळणाऱ्यांमध्ये शंकर महादेवन, डॉ. कोल्हे दाम्पत्य, अभिेनेता मनोज वाजपेयी, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम काटे, साहित्यिक नगीनदास संघवी, वन्यप्राणी सेवा कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे.
 • यंदाच्या 112 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यापैकी चार जणांना पद्मविभूषण, 14 जणांना पद्मभूषण आणि 94 जणांना पद्मश्री किताब जाहीर झाले आहेत.
 • तसेच यामध्ये 21 महिला असून, 11 परदेशी नागरिक आहेत. कादर खान यांचा उल्लेख कॅनडामधील रहिवासी असा आहे. तर तीन जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. याखेरीज यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे एका तृतीयपंथी व्यक्तीचीही पद्म पुरस्कारासाठी सरकारने निवड केली आहे.

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका ‘कृष्णा सोबती’ कालवश:

 • ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोबती यांचे 25 जानेवारी रोजी निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या.
 • कृष्णा सोबती यांच्या वयाची फेब्रुवारीत 94 वर्षे पूर्ण होणार होती. गेला एक आठवडा त्या अतिदक्षता विभागात होत्या. सायंकाळी निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Krushna Sobati
 • वृद्धापकाळातही त्यांना समाजातील घडामोडींची जाणीव होती. कृष्णा सोबती या संवेदनशील व सजग लेखिका होत्या. साहित्यात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती.
 • ‘छन्ना’ हे त्यांचे पुस्तक 11 जानेवारीला नवी दिल्ली जागतिक पुस्तक जत्रेत प्रकाशित करण्यात आले होते. खरेतर हे पुस्तक म्हणजे त्यांची साठ वर्षांपूर्वी लिहिलेली पहिली कादंबरी आहे. काही कारणास्तव ती प्रकाशित झाली नव्हती.
 • कृष्णा सोबती यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1925 रोजी झाला होता. ‘स्त्री ओळख व लैंगिकता’ यावर त्यांनी लेखन केले. ‘मित्रों मर्जानी’, ‘जिंदगीनामा’, ‘सूरजमुखी अंधेरे के’ ही त्यांची आणखी पुस्तके आहेत.
 • तसेच त्यांना साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, त्यांना पद्मभूषणही देऊ केले होते पण ते त्यांनी नाकारले. कवी अशोक वाजपेयी यांनी सांगितले, की त्यांनी साहित्यातून लोकशाहीच्या विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडली. साहित्यात त्यांचे योगदान अजोड असून समता, न्याय यासाठी त्यांनी लढा दिला.

हापूस आंब्याची जीआय नोंदणीला सुरुवात:

 • ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील आंब्याला ‘हापूस’ भौगोलिक निर्देशांक (जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन) मिळाले.
 • तसेच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या हंगामाच्या सुरूवातीला मानांकन प्राप्त चार संस्थांमार्फत सुरू झाली आहे; अन्य आंब्यासाठी हापूस वापरल्यास कायदेशीर कारवाईसाथी स्वतंत्र यंत्रणा उभारणार आहे, असे डॉ. विवेक भिडे यांशी सांगितले.
 • हापूस नावाने आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्था मर्यादित (रत्नागिरी), देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित (जामसंडे, देवगड) आणि काळाशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संघ मर्यादित (केळशी, ता. दापोली) या संस्थांची नोंदणी बंधनकारक आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्‍या विक्रेत्यांना कायदेशी कारवाईला सामोरे जावे लागेल. पाच जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य ठिकाणच्या आंब्याला हापूस किंवा अल्फान्सो हे नाव वापरता येणार नाही, असे डॉ, भिडे यांनी सांगितले.

दिनविशेष:

 • 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 • 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारचा कायदा 1935 बदलून भारत संविधान लागू झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारला आणि 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही सरकार व्यवस्था येऊन भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश म्हणून जन्माला आला.
 • सन 1876 मध्ये मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
 • सन 1949 मध्ये भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
 • सन 1950 या वर्षी भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
 • एच.जे. कनिया यांनी सन 1950 मध्ये भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • सन 1965 मध्ये भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
 • महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सन 1978 मध्ये सुरू झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World