26 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 February 2019 Current Affairs In Marathi

26 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 फेब्रुवारी 2019)

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ‘स्मृती मानधना’:

 • इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कर्णधारपदी यावेळी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित करण्यात आले आहे. Smriti Mandhana
 • भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने 4, 7, 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत.
 • भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद मिताली राजकडून हरमनप्रीत कौरकडे आले होते. आता हरमनप्रीतनंतर भारताच्या कर्णधारपदाची धुरा स्मृतीकडे सोपवण्यात आली आहे.
 • तसेच यापूर्वी स्मृतीला एकदा संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. पण हा सामना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्हता.

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक:

 • पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थेने दिले आहे.
 • पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा 3 कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते.
 • तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 • मात्र, या हल्ल्यात सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.

मॉर्व्हलला ऑस्कर मिळवून देणारा पहिला आफ्रिकन सुपरहिरो:

 • माव्‍‌र्हलच्या डेडपूल, व्हिजन, नोव्हा, स्पीड, लुना यांसारख्या दुसऱ्या फळीतील नवीन सुपरहिरोंच्या फौजेत नवीनच भरती झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ने ऑस्करमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मार्व्हल स्टुडिओसाठी ऑस्कर जिंकणारा ‘ब्लॅक पँथर’हा पहिलाच आफ्रिकन सुपरहिरो ठरला आहे. OSCAR
 • ‘रोमा’ आणि ‘बोहेमियन ऱ्हाप्सडी’नंतर सर्वाधिक नामांकनं ही ‘ब्लॅक पँथर’ला मिळाली होती. सात नामांकनं या चित्रपटाला मिळाली यातल्या तीन पुस्करांवर ‘ब्लॅक पँथर’नं आपली मोहोर उमटवली आहे.
 • ‘ब्लॅक पँथर’हा मार्व्हल स्टुडिओचा पहिला आफ्रिकन सुपरहिरो आहे. जगभरातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त समीक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन, ओरिजनल स्कोअर या तिन्ही प्रकारात ‘ब्लॅक पँथर’नं पुरस्कार पटकावला आहे.

राज्यात पहिल्यांदाच राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी:

 • महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथीयाची निवड करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांची निवड करण्यात आली आहे.
 • शिवाजी पार्क येथे 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या ही घोषणा करण्यात आली आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्त होणाऱ्या दिशा शेख या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी प्रवक्त्या आहेत.
 • आवाज नसलेल्या तृतीयपंथी समुदायाच्या व्यक्तीला थेट आपल्या पक्षाचाच आवाज बनविणे, हे भारतातील खऱ्या अर्थाने वंचितांचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकरच करु शकतात. मी आणि आमचा तृतीयपंथी समुदाय यासाठी बाळासाहेबांचा ऋणी आहे, अशा शब्दांत दिशा शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 • तसेच, आतापर्यंत आमच्या समुदायातील काही व्यक्ती आमदार, खासदार झाल्या. मात्र आम्हां तृतीयपंथियांवरील अन्यायाचा आवाज संसदेपर्यंत कधी पोहोचलाच नाही. वंचित बहुजन आघाडीने आम्हांलाच आवाज बनविले ही आम्हां समस्त तृतीयपंथियांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 • वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ते म्हणून दिलेली संधी आम्हां तृतीयपंथियांसाठी नवचैतन्य निर्माण करणारी आहे. यामुळे आम्ही निश्चितच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ. हेटाळणीचे सूर आता कौतुकाचे बोल बोलू लागतील हा आशावाद देखील पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण:

 • देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेससह नेहरु-गांधी घराण्यावर निशाणा साधला. RYS
 • बोफोर्सपासून हेलीकॉप्टर घोटाळ्यापर्यंतची चौकशी एकाच कुटुंबाकडे जाते. त्यामुळे सर्वकाही समजून जाते. काही लोकांसाठी देश पहिला नाही, तर परिवार आणि परिवाराचे हित आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरु-गांधी घराण्यावर यावेळी हल्लाबोल केला.
 • 2009 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केली होती. मात्र 2009 ते 2014 पर्यंत एकही बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करण्यात आले नाही. मात्र, गेल्या चार वर्षात या आमच्या सरकारने सैनिकांसाठी 2 लाख 30 हजार पेक्षा जास्त बुलेट प्रूफ जॅकेट्स खरेदी केली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
 • गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी मागणी केली जात होती. मात्र, आपल्या आशीर्वादामुळे 2014 मध्ये सुरू केलेले काम आज पूर्णत्वास गेले. सैनिकांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आणि शौर्यामुळे जागतिक पातळीवर ताकदवान देशांच्या यादीत भारताची गणना होत आहे.
 • देशाच्या सैन्याला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून नियमित प्रयत्न केले जाणार आहेत. सैनिकांसाठी अत्याधुनिक शस्त्र खरेदीसाठी सुरुवात झाली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

दिनविशेष:

 • प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1874 मध्ये झाला.
 • वि.स. खांडेकर यांना 1976 यावर्षी ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाला.
 • सन 1984 मध्ये इन्सॅट-1-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
 • परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने 26 फेब्रुवारी 1998 रोजी एका दिवसात 14.709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातीलत्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.