26 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

 रे इलिंगवर्थ
रे इलिंगवर्थ

26 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2021)

मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली.
 • तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले.
 • आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 • तर देशात 18 लाख विलगीकरण खाटा, पाच लाख प्राणवायूयुक्त खाटा, एक लाख 40 हजार अतिदक्षता खाटा, मुलांसाठी 90 हजार खाटा आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
 • तसेच देशात 3000 प्राणवायूनिर्मिती केंद्रे असून देशभर चार लाख प्राणवायू र्सिंलडरचे वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
 • दरम्यान, भारतीय औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशीचा आपत्कालीन वापर 12 ते 18 वयोगटातील किशोरवयीनांना करण्यास मंजुरी शुक्रवारी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
 • महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2021)

लातूरमधील एनजीओ दत्तक घेणार जनरल बिपिन रावत यांचं वडिलोपार्जित गाव :

 • तामिळनाडूमध्ये 8 डिसेंबरला झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले.
 • तर त्यांच्या निधनानंतर त्यांचे वडिलोपार्जित गाव दत्तक घेण्यासाठी महाराष्ट्रातील एका एनजीओकडून प्रयत्न सुरू आहेत.
 • लातूरमधील डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानला (HBPP) पौरी गढवाल जिल्हा अधिकाऱ्यांनी सैंज गावात विकास उपक्रम राबविण्याची परवानगी दिली आहे.

इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार, प्रशिक्षक रे इलिंगवर्थ यांचे निधन :

 • इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार आणि प्रशिक्षक रे इलिंगवर्थ यांचे वयाच्या 89व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले.
 • 1970-71मध्ये इलिंगवर्थ यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची किमया साधली होती.
 • इलिंगवर्थ यांनी 1957 ते 1973या कालावधीत 61 कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना 23.24 च्या सरासरीने 1836 धावा केल्या आणि 122 बळी घेतले.

दिनविशेष:

 • आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1893 रोजी झाला होता.
 • कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक ‘डॉ. मुरलीधर देवीदास’ उर्फ बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
 • स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री ‘डॉ. सुशीला नायर‘ यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
 • सन 1976 मध्ये कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना करण्यात आली.
 • विंदा करंदीकर यांना सन 1997 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.