26 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 December 2019 Current Affairs In Marathi
26 December 2019 Current Affairs In Marathi

26 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2019)

पाणी व्यवस्थापनासाठी अटल भूजल योजना :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त बुधवारी येथे अटल भूजल योजना जाहीर केली. या योजनेद्वारे भूजलाचे व्यवस्थापन केले जाणार असून प्रत्येक घरी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
 • तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या 18 कोटी लोकांपैकी केवळ 3 कोटी लोकांनाच जलवाहिनीद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते.
 • तसेच या योजनेमुळे पुढील पाच वर्षांत उर्वरित 15 कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.
 • शेतकऱ्यांनी कमी पाण्यात होणारी पिके घ्यावीत असे सांगतानाच मोदी यांनी लोकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याची विनंती केली.
 • तसेच अटल भूजल योजनेला 12 डिसेंबर रोजी जागतिक बँकेकडून मंजुरी मिळाली आहे. 6000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असणाऱ्या या योजनेचा 50 टक्के खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित खर्च जागतिक बँक करणार आहे.
 • ही योजना पाण्याची कमतरता असलेल्या उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. भूजलाची कमतरता, प्रदूषण आणि अन्य बाबींचा विचार करून वरील राज्यांची निवड करण्यात आली आहे.
 • पाण्याचा प्रश्न या योजनेमुळे सुटणार असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी सरकारला खात्री आहे. या योजनेचा फायदा 8,350 गावांना होणार आहे.
 • ग्राम पंचायत स्तरावर जलसुरक्षिततेसाठी योजनेद्वारे कार्य केले जाणार असून त्यासाठी शैक्षणिक आणि संवादात्मक कार्यक्रम केले जाणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2019)

शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय :

 • डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे. त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.
 • भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.
 • त्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे.
 • तर पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे. हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे. हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज करु शकता. यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु
  शकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही.
 • यातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडून किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.
 • तसेच या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.
 • या पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता
  येणार आहे. हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धात अंजुमची हॅट्ट्रिक :

 • भारताच्या आघाडीच्या रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी 63व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली आहे. अंजुम मुद्गिलने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.
 • तर याचप्रमाणे अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देसवालने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या हर्षदा निथावे आणि अनिकेत जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने कनिष्ठ मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक मिळवताना राष्ट्रीय स्पर्धेतील सातव्या सुवर्णाची नोंद केली. तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि सांघिक गटांमध्ये चार सुवर्णपदके जिंकली होती.
 • अंजुमने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान मिळवताना 1172 गुण मिळवले. मग अंतिम फेरीत सुवर्णलक्ष्य साधताना अंजुमने 449.9 गुण मिळवले, तर तमिळनाडूच्या एन. गायत्रीला 2.6 गुण कमी मिळाले.

कोहली ठरला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू :

 • मागील दहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांवर वर्चस्व गाजवणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याला ‘द क्रिकेटर’ या पाक्षिकाने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.
 • तर पाक्षिकाने गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 50 क्रिकेटपटूंची यादी तयार केली असून, त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.
 • भारताकडून कोहलीसह रविचंद्रन अश्विन 14 व्या, रोहित शर्मा 15 व्या, महेंद्रसिंग धोनी 35 व्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा 36 व्या स्थानावर आहे.
 • तसेच महिला क्रिकेटपटू मिताली राज 40 व्या स्थानी आहे.

देशातील सव्वालाख गावांत मार्चपर्यंत मोफत वाय-फाय :

 • भारत नेटशी जोडलेल्या देशभरातील सव्वा लाख गावांत मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हरियाणातील रेवाडी येथे केली.
 • तर येत्या चार वर्षांत देशभरातील 6 लाख गावांपैकी 15 टक्के गावांचे रुपांतर डिजिटल गावांत केले जाईल, असे सांगत त्यांनी बुधवारी रेवाडीस्थित गुरुवारा गाव डिजिटल गाव म्हणून घोषित केले.
 • देशभरातील 1.3 लाख ग्राम पंचायती भारत नेट प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. अडीच लाख ग्रामपंचायती भारत नेट आॅप्टिकल फायबरशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
 • इंटरनेट सेवा लोकप्रिय करण्यासाठी भारतनेटशी जोडल्या गेलेल्या सर्व गावांना मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल. सध्या 48 हजार गांवात वाय-फाय सुविधा आहे.
 • अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी रेवाडी गावाचे रुपांतर डिजिटल गावांत झाल्याने आनंद होत आहे. यामुळे गावकऱ्यांना शहर, तालुक्याला न जात गावातच एक क्लिकवर सरकारी योजना व सेवा उपलब्ध होईल. या गावांतील प्रत्येक घर वाय-फाय सुविधा उपलब्ध असेल. एक लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांत करण्याच्या  घोषणेनंतर भिवाडी नजीक अल्वरस्थित करींदा गावात व्हीएनएल कंपनीने डिजिटल गावांचे प्रारुप तयार केले होते. तत्कालीन दूरसंचार सचिवांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले होते.

दिनविशेष:

 • आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1893 रोजी झाला होता.
 • कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक ‘डॉ. मुरलीधर देवीदास’ उर्फ बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
 • स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री ‘डॉ. सुशीला नायर‘ यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
 • सन 1976 मध्ये कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना करण्यात आली.
 • विंदा करंदीकर यांना सन 1997 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2019)

You might also like
2 Comments
 1. Abhishek Sonawane says

  Massive writing,suitable for competitive exam students , detailed content 👌

  1. Dhanshri Patil says

   Thank you!

Leave A Reply

Your email address will not be published.