26 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती अधिक वेगाने
बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती अधिक वेगाने

26 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2020)

आकाशगंगेपेक्षा बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती जास्त वेगाने :

 • आपल्या आकाशगंगेपेक्षा काही बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती 10 ते 100 पट अधिक वेगाने होते असे आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे.
 • तर आपल्या विश्वात अब्जावधी दीर्घिका असून त्यातील अनेक बटू दीर्घिका आहेत, या दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा वस्तुमानाने कमी आहेत. या लहान दीर्घिकांना बटू दीर्घिका असे म्हटले जाते.
 • तसेच त्यांच्यात ताऱ्यांची निर्मिती कमी वेगाने होत असते पण काही बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती नेहमीच्या दीर्घिकांच्या तुलनेत 10 ते 100 पट वेगाने होत असते. आपल्या आकाशगंगेपेक्षाही या दीर्घिकात जास्त वेगाने तारे तयार होतात. पण तारे निर्मितीची ही प्रक्रिया लाखो वर्षांनंतर बंद होते. या दीर्घिकांचे वय मात्र काही अब्ज वर्षे असते.
 • वैज्ञानिकांनी या दीर्घिकांचा अभ्यास दोन भारतीय दुर्बिणींच्या मदतीने केला असून त्यात त्यांचे गुणधर्म वेगळे दिसून आले. त्यांच्यात हायड्रोजन वेगळ्या पद्धतीने विखुरलेला होता व दोन दीर्घिकांमधील टकरीही वेगळ्या होत्या.
 • हायड्रोजन हा ताऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक असल्याचे सांगून वैज्ञानिक अमितेश ओमर यांनी म्हटले आहे की, जर ताऱ्यांची निर्मिती वेगाने व्हायची असेल तर त्यासाठी दीर्घिकेत हायड्रोजनचे प्रमाण जास्त असावे लागते.
 • ओमर व त्यांचे माजी विद्यार्थी सुमित जैसवाल यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केले असून त्यासाठी नैनिताल येथील देवस्थळची 1.3 मीटरची जलद प्रकाशीय दुर्बीण व पुण्याची जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप यांचा वापर करण्यात आला.
 • तसेच ओमर यांनी आयनीभूत हायड्रोजनशी जुळणाऱ्या प्रकाशीय प्रारणांची तरंगलांबी मोजण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी या दीर्घिकांमधून येणाऱ्या प्रारणांच्या वर्णपंक्ती रेषेच्या मदतीने 45 मीटर व्यासाच्या तीस अँटेनांच्या मदतीने प्रतिमा तयार करण्यात आल्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2020)

चिनी फायटर जेट्सचा वेध घेण्यासाठी भारताने तैनात केली ‘इग्ला’सिस्टिम :

 • पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने उंचावरील प्रदेशात खांद्यावरुन मिसाइल डागता येणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांच्या तुकडया तैनात केल्या आहेत.
 • तर शत्रुच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने उंचावरील प्रदेशात रशियन बनावटीच्या इग्ला एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांना तैनात केले आहे.
 • तसेच रशियन बनाटीच्या या एअर डिफेन्स सिस्टिमचा भारतीय लष्कर आणि इंडियन एअर फोर्स दोघेही वापर करतात.
 • युद्धाच्या प्रसंगात किंवा शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर तुमच्या तळाजवळ येतात, तेव्हा या सिस्टिमचा वापर केला जातो. भारताने सुद्धा आपली टेहळणी क्षमता वाढवली आहे.
 • चीनच्या हवाई हालचालींवर रडार्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जातेय तसेच जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल्स सुद्धा सज्ज ठेवली आहेत.
 • भारतीय हद्दीतील भागांमध्ये चिनी हेलिकॉप्टर्स प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सैन्याला दिसले आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी हवाई हद्दीचे उल्लंघन करु नये, यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून इंडियन एअर फोर्सने सुखोई फायटर विमाने तैनात केली आहेत.

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले :

 • आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून कार्डचा वापर वाढत आहे. रिझर्व्ह बँक कार्ड व्यवहारात सुरक्षा वाढवण्यासाठी सतत पावले उचलत आहे.
 • तर यामध्ये आरबीआयने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत. आरबीआयने सर्व बँकांना भारतात कार्ड देताना केवळ एटीएम आणि PoS वर फक्त डोमेस्टिक कार्डचा वापरण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे.
 • तसेच, आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय, ऑनलाइन व्यवहार, कार्ड नसताना होणारे व्यवहार आणि कॉन्टेक्टलेस व्यवहारांसाठी ग्राहकांना आपल्या कार्डवर सेवांचा वेगळा सेट करावे लागेल.
 • आरबीआयकडून हे नवीन नियम जानेवारीत जाहीर करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 • आता ग्राहकांना डेबिट आणि क्रेडिट कार्ड देताना स्थानिक व्यवहार करण्यास परवानगी द्यावी, असे आरबीआयने बँकांना सांगितले आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते की जर गरज नसेल तर एटीएम मशीनमधून पैसे काढू देऊ नका आणि पीओएस टर्मिनलवर खरेदीसाठी परदेशी व्यवहार करू देऊ नका.
 • आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार आणि कॉन्टॅक्टलेस कार्डच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना यासाठी स्वतंत्रपणे त्यांची पसंती नोंदवावी लागेल. म्हणजे जर ग्राहकाला त्याची आवश्यकता असेल तरच त्याला ही सेवा मिळेल म्हणजेच त्याला त्यासाठी अर्ज करावा लागेल.
 • सध्याच्या कार्ड्साठी, ग्राहक आपल्या जोखमीनुसार निर्णय घेऊ शकतात. याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या कार्डाद्वारे देशांतर्गत व्यवहार किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार हवे असल्यास, याबाबत ग्राहक कोणत्याही वेळी निर्णय घेऊ शकतो की त्याला कोणती सेवा सक्रीय करावी लागेल आणि कोणती असक्रीय करावी लागेल.
 • ग्राहक 24 तासांत कोणत्याही वेळी त्याच्या व्यवहाराची मर्यादा बदलू शकतो. म्हणजे, आता ग्राहक आपल्या एटीएम कार्डला मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएमममध्ये जाऊन आयव्हीआरद्वारे त्याच्या व्यवहाराची मर्यादा सेट करू शकतो.
 • आरबीआयने जारी केलेले एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम 30 सप्टेंबर 2020 पासून लागू होतील.

दिनविशेष :

 • 26 ऑगस्ट 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
 • भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा 26 ऑगस्ट 1910 मध्ये जन्म.
 • 26 ऑगस्ट 1999 मध्ये डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.