26 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 August 2018 Current Affairs In Marathi

26 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2018)

श्रीलंकेत सिगारेट विक्रीवर बहिष्कार :

  • श्रीलंकेतील 100 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. देशाला तंबाखूमुक्त करण्याच्या दृष्टीने या 100 शहरांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
  • तसेच जाफना येथील 22, मतारा येथील 17 आणि कुरुनेगाला येथील 16 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
  • तर सध्या 107 शहरं या मोहिमेत सहभागी असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.

दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटल बिहारी वाजपेयींचे नाव :

  • दिल्लीतील रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.Atal Bihari Vajpayee
  • तर उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून 30 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे.
  • दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार करण्यात आले. या मैदानात दरवर्षी रामलीलेचे आयोजन केले जायचे. त्यामुळे मैदानाला रामलीला मैदान असे नाव पडले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2018)

भारतीय नौदलाला मिळणार 111 नवी हेलिकॉप्टर्स :

  • संरक्षण मंत्रालयाकडून नौदलासाठी 111 बहुद्देशीय हेलिकॉप्टर्सना मंजूरी देण्यात आली आहे.
  • यासाठी 21,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर 24,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम अन्य गरजांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
  • तर यांपैकी 3,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम 150 स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टिमसाठी देखील देण्यात येणार आहे.
  • संरक्षण अधिग्रहण परिषदेद्वारे (डीएसी) देण्यात आलेल्या या एकूण 46,000 कोटी रुपयांच्या निधीमुळे नौदल आजच्या तुलनेत अधिक सशक्त होणार आहे.
  • गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने नौदलाच्या आगाऊ युद्ध सामग्रीसाठी 9 अॅक्टिव्ह टोड ऐरे सोनार सिस्टिमच्या खरेदीसाठी 450 कोटी रुपयांच्या प्रस्तावासाठी मंजूरी दिली होती.

व्यासंगी पत्रकार कुलदीप नय्यर कालवश :

  • सत्तेच्या दबावापुढे गुडघे टेकणे सोडाच कधी मानदेखील न वाकवणारे.. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला निर्भीडपणे विरोध करून तुरुंगात जाणारे.. भारत-पाक शांतीपर्वासाठी अव्याहतपणे संघर्ष करणारे मानवतावादी आणि व्यासंगी पत्रकार,
    ‘इंडियन एक्स्प्रेस’चे माजी संपादक कुलदीप नय्यर यांचे निधन झाले आहे.
  • तसेच सक्रिय पत्रकारितेतून निवृत्त झाल्यानंतरही स्तंभलेखनाच्या माध्यमातून नय्यर यांनी आपली पत्रकारिता सुरू ठेवली होती.
  • ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाने 2015 साली पत्रकारितेतील त्यांच्या देदीप्यमान कार्याचा यथोचित गौरव रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन केला होता.

जपानवरील विजयासोबत भारतीय हॉकी संघाचा नवीन विक्रम :

  • भारतीय हॉकी संघाने जपानवर 8-0 ने मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.
  • तसेच जपानवरील विजयानंतर भारतीय संघाने एशियाड स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे.
  • 1982 साली झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावावर आधी या विक्रमाची नोंद होती.
  • तर झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 45 गोलची नोंद केली होती आणि यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 51 गोलची नोंद केली आहे.

तजिंदरपालची विक्रमी कामगिरी :

  • आशियाई खेळांच्या स्पर्धेत सातव्या दिवसाच्या खेळात भारताने गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग याने भारताला ही सुवर्णकमाई करून दिली. त्याने 20.75 मीटरची विक्रमी फेक केली.
  • त्याआधी स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लिकल हिने कांस्यपदकाची कमाई करत आपले खाते उघडले होते. त्यापाठोपाठ जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांनीही भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली होती.
  • तजिंदर पाल याने सर्वप्रथम 19.96 मीटरची फेक केली होती.

दिनविशेष :

  • 26 ऑगस्ट 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
  • भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा 26 ऑगस्ट 1910 मध्ये जन्म.
  • 26 ऑगस्ट 1999 मध्ये डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.