26 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 April 2019 Current Affairs In Marathi

26 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 एप्रिल 2019)

भारतीय लष्कर हायटेक होणार:

 • भारत सरकार लवकरच सुरक्षादलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दूर्गम भागात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणाऱ्या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे.
 • सरकारने 613 कोटी 96 लाखांचे बजेट पास केले आले आहे. या पैश्यांमधून केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणाऱ्या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
 • गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (एनएसजी) 16 कोटी 84 लाखांची तरतूद करण्यात आली असून या पैश्यांमधून रोमोटने चालणारी सात वाहने विकत घेतली जाणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 एप्रिल 2019)

महिलांचा सैनिक होण्याचा मार्ग मोकळा:

 • भारतीय लष्कराने 25 एप्रिलपासून महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. लष्करातील ‘मिलिटरी पोलिस’ विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. Indian Army
 • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी महिलांना लष्करात भरती करुन घेण्याची घोषणा केल्यानंतर चार महिन्यांनी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
 • लष्कराने यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली असून भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जून असणार आहे.
 • भारतीय सुरक्षा दलांमध्ये महिलांना आजवर केवळ अधिकारी पदावर नियुक्त केले जात होते. वैद्यकीय, कायदा, अभियांत्रिक अशा लष्काराच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये महिलांना समाविष्ट करुन घेतले जात होते. मात्र आता तरुणींना थेट लष्करी जवान बनण्याची संधी उपलब्ध होणार असून करियरचा नवा पर्याय म्हणून याकडे पाहता येणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा 2019:

 • गेल्या 30 वर्षांत आपली आगळी-वेगळी ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले गेले.
 • प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळयाचे वितरण काल दिनांक 24 एप्रिल, 2019 रोजी मुंबई येथील षणमुखानंद हॉल येथे पार पडले. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असून यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख माननीय श्री मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
 • यावर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव श्री सलीम खान यांना प्रदान करण्यात आला.
 • भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी श्री मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार तर श्रीमती हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले गेले.
 • तसेच साहित्य क्षेत्रात श्री वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले गेले. भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयारे सकाळ’ हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात आले.
 • तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आशियाई कुस्ती स्पर्धेत दिव्या, मंजूला कांस्यपदक:

 • भारताच्या दिव्या काकरान आणि मंजू कुमारी यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. aashiyaai sport
 • आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती दिव्या हिने 68 किलो वजनी गटाच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीत मोंगोलियाच्या बॅटसेटसेग सोरोंझोनबोल्ड हिला हरवत कांस्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर मंजू कुमारीने व्हिएतनामच्या थी हुआँग डाओ हिला 11-2 असे पराभूत करत भारताच्या खात्यात दुसऱ्या कांस्यपदकाची भर घातली.
 • दिव्या आणि मंजू यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे कांस्यपदकासाठीच्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली. 2017 मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या दिव्याला उपांत्य फेरीत चीनच्या फेंग झोऊ हिच्याकडून 4-14 असा पराभव पत्करावा लागला.
 • तर त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत दिव्याने व्हिएतनामच्या हाँग थुय गुयेन हिला 10-0 असे हरवले होते. गुडघ्याच्या दुखापतीनंतर पुन्हा एकदा पुनरागमन करणाऱ्या दिव्यासाठी कांस्यपदक विशेष मानले जात आहे.

ISSF World Cup स्पर्धेत भारताला सुवर्णपदक:

 • चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली आहे.
 • मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने 10 मी. एअर पिस्तुल मिश्र प्रकारात सुवर्णपदक कमावले. याआधी 10 मी. एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
 • मनू-सौरभ जोडीने अंतिम फेरीत आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवले. यजमान चीनच्या जोडीवर 16-6 अशी मात करत भारतीय जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत मनू-सौरभ जोडीने 482 गुणांसह पाचवे स्थान मिळवले होते. मनू-सौरभ व्यतिरीक्त हिना सिद्धु-शेहजार रिझवी या भारतीय जोडीला बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

दिनविशेष:

 • 26 एप्रिल हा दिवस ‘जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन’ आहे.
 • पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म 26 एप्रिल 1479 मध्ये झाला होता.
 • अटलेटीको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना 1903 मध्ये झाली.
 • सन 1964 मध्ये टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.
 • जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणार्‍या अधिवेशनाची अंमलबजावणी सन 1970 मध्ये झाली होती.
 • सन 1973 मध्ये ‘अजित नाथ रे’ हे भारताचे 14वे सरन्यायाधीश झाले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 एप्रिल 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.