25 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे निधन:
अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे निधन

25 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2020)

अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे निधन:

  • ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने गुरुवारी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
  • वयाची 68 वर्षे पूर्ण केल्यानंतर तीनच दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • डॉ. बसू यांना 2014 साली पद्मश्री उपाधीने गौरवण्यात आले होते. ‘आयएनएस अरिहंत’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या पाणबुडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी (रिअ‍ॅक्टर) तयार करण्याचेही ते प्रणेते होते.
  • 2012 साली डॉ. बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली.
  • तारापूर व कलपक्कम येथील ‘न्यूक्लियर रिसायकल प्लांट’ यांचा आराखडा, बांधकाम व संचालन यामागे प्रामुख्याने त्यांचीच प्रतिभा होती.

‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी:

  • संरक्षण क्षेत्रात स्वत:ला अधिक बळकट करत भारतानं मोठं यश संपादन केलं आहे.
  • स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.
  • ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.
  • पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे.
  • “350 किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-3 मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यां दिली.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन:

  • ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.
  • ते 59वर्षांचे होते. IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे.
  • नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं.
  • जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते आज नाराज असतील आणि त्यांना मिस करत असतील”, अशा शब्दात स्टार इंडियाने डीन जोन्स यांना आदरांजली वाहिली.

दिनविशेष:

  • तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 मध्ये झाला.
  • सन 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
  • इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म 25 सप्टेंबर 1920 मध्ये झाला.
  • सन 1999 मध्ये अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन, रसायन शास्त्रज्ञ प्रा.एम.एस. शर्मा तसेच डॉ. पाल रत्नासामी यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.