25 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2018)
सिक्कीमच्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी, मोदींसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूही उपस्थित होते. सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी गंगटोकमध्ये दाखल झाले होते.
- सिक्कीममधील या विमानतळाचे काम 2009 मध्ये सुरू करण्यात आले होते. विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यास जवळपास 9 वर्षाचा कालावधी लागला आहे. हे सिक्कीममधील पहिले विमानतळ असून सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून हे जवळपास 33 कि.मी. अंतरावर आहे.
- तसेच हे विमानतळ 201 एकरवर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आले आहे. सिक्कीममधील या पहिल्याच विमानतळामुळे सिक्कीम आता हवाई वाहतुकीच्या नकाशावरही दिसणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘फिफा’कडून सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर:
- FIFA World Cup 2018 मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले होते. त्यांनी क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला.
- फ्रान्सकडून पूर्वार्धात 2 आणि उत्तरार्धात 2 असे एकूण 4 गोल करण्यात आले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी 1-1 गोल केला. या स्पर्धेसाठी फ्रान्सचे प्रशिक्षक असलेल्या दिदिएर देशॉ यांना FIFAचा यंदाचा सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. फ्रान्सने अंतिम सामना जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगज्जेतेपद नोंदवण्यात आले.
- या विजेतेपदामुळे त्यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला. संघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे देशॉ हे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले होते.
किरकोळ कर्जात तीन राज्यांचा वाटा:
- देशातील एकूण किरकोळ कर्जापैकी तब्बल 40 टक्के कर्ज महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत वितरित झाले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली.
- विशेष म्हणजे या राज्यांचा देशाच्या एकूण लोकसंख्येतील वाटा फक्त 20 टक्के आहे. म्हणजेच 20 टक्के लोक राहत असलेल्या राज्यांत 40 टक्के कर्जवितरण झाले आहे. ‘ट्रान्सयुनियन सिबिल’ या संस्थेने 24 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली.
- अहवालात म्हटले आहे की, 2018 च्या मध्यातील म्हणजेच 30 जून रोजीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत देशातील एकूण किरकोळ कर्जातील 40 टक्के कर्ज दिले गेले आहे. या राज्यांत एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोकसंख्या राहत असताना एकूण कर्जधारक लोकसंख्येचे प्रमाण 32 टक्के आहे.
कमांडर अभिलाष टॉमी यांची सुखरुप सुटका:
- हिंदी महासागरात स्पर्धेदरम्यान जखमी होऊन तीन दिवस अडकून पडलेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांची सुटका करण्यात आली. अभिलाष यांनी गोल्डन ग्लोब स्पर्धेत सहभाग घेतला होता.
- छोट्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करत असताना ऑस्ट्रेलियापासून 1900 सागरी मैल अंतरावर त्यांना वादळाचा तडाखा बसला. वादळामुळे समुद्रात 14 मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या वादळात त्यांच्या बोटीचे नुकसान होऊन त्यांच्या पाठीला जखम झाली. अभिलाष यांनी स्पर्धेच्या आयोजकांना संदेश पाठवत परिस्थिती सांगितली. आपल्या पाठीला जबर मार बसला असून हालताही येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
- तसेच त्यानंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या नौदलांनी आपली बचावपथके रवाना केली. तीन दिवसांनंतर फ्रान्सचे पथक सर्वप्रथम अभिलाष यांच्या बोटीजवळ पोहोचले आणि त्यांना सुखरुप बाहेर काढले.
- बिकट हवामानात आणि जखमी असतानाही अभिलाष यांनी तीन दिवस बोटीवर तग धरला. अभिलाष हे कीर्तिचक्र विजेते आहेत. त्यांनी 2013 मध्ये पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली होती.
- गोल्डन ग्लोब या तीस हजार मैल प्रवास करण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांना सॅटेलाइट फोन व्यतिरिक्त कोणत्याही आधुनिक साधनांचा वापर न करता एकट्याने स्पर्धा पूर्ण करायची असते.
दिनविशेष:
- तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 मध्ये झाला.
- सन 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
- इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म 25 सप्टेंबर 1920 मध्ये झाला.
- सन 1999 मध्ये अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन, रसायन शास्त्रज्ञ प्रा.एम.एस. शर्मा तसेच डॉ. पाल रत्नासामी यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा