25 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

25 October 2018 Current Affairs In Marathi

25 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 ऑक्टोबर 2018)

भारत-इस्त्रायल मध्ये मिसाइल सिस्टिम करार:

 • रशिया पाठोपाठ भारताने इस्त्रायल बरोबर एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा खरेदी करार केला आहे.
 • इस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज ही सरकारी कंपनी 777 मिलियन डॉलरचे हे अतिरिक्त कंत्राट मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. israel-deal-777
 • तर भारतीय नौदलाच्या सात जहाजांवर इस्त्रायल एअरोस्पेसची एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा तैनात केली जाईल.
 • केंद्र सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबरोबर हा करार करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या एअरोस्पेस इंडस्ट्रीजकडून ही माहिती देण्यात आली.
 • एलआरएसएएम सिस्टिम बराक 8 कुटुंबाचा भाग असून इस्त्रायली नौदलबरोबरच भारताचे नौदल, हवाई दल आणि भूदल या सिस्टिमचा वापर करते. या नव्या करारामुळे बराक आठ क्षेपणास्त्राच्या विक्रीचा व्यवहार 6 अब्ज डॉलरपेक्षा पुढे गेला आहे असे आयएआयकडून सांगण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2018)

लैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रिगट स्थापन:

 • कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी व त्याला आळा घालण्यासाठी कायदेशीर व संस्थात्मक चौकट बळकट करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.
 • देशात सुरू असलेल्या ‘मी टू’ मोहिमेत अनेक महिलांनी त्यांचा कामाच्या ठिकाणी कथितरीत्या छळ केलेल्या लोकांची जाहीररीत्या नावे घेतली आहेत. माजी सहकारी महिलांनी अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर विख्यात पत्रकार एम.जे. अकबर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 • राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या मंत्रिगटात (जीओएम) केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांचा समावेश आहे.
 • कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाची प्रकरणे हाताळण्यासाठी जीओएम सध्याच्या कायदेशीर व संस्थात्मक चौकटीची तपासणी करेल.

विराट कोहली बनला ‘दस हजारी’ मनसबदार:

 • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. VK
 • सचिनने 259 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ 205 डावांमध्ये हा पराक्रम केला. पहिल्या सामन्यातील 140 धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीच्या नावावर 212 एकदिवसीय सामन्यात 204 डावांत 9919 धावा जमा झाल्या होत्या. त्यानंतर 81 धावांची भर घालून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 36 शतके आणि 49 अर्धशतके झळकावली आहेत.
 • तसेच दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

सन 2020 पासून BS-4 या वाहनांची विक्री बंद होणार:

 • वाहनांमधून होणारे प्रदूषण हे पर्यावरणाला हानिकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
 • 1 एप्रिल 2020 पासून भारतात भारत स्टेज-4 म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून 1 एप्रिल 2020 नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे.
 • एप्रिल 2017 मध्ये BS-4 वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती. आताच्या BS-4 वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ही वाढ एक ते दिड लाखांपर्यंत होईल असे बोलले जात आहे.
 • BS-6 मुळे कार बनविण्याच्या खर्चात वाढ होणार आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात भारतात दिल्लीमध्ये BS-6 सुविधेच्या कारमध्ये इंधन भरण्याची सुविधा पहिल्यांदा दिल्लीत उपलब्ध झाली. मात्र या नव्या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याला मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • कंपन्यांनी आता आपल्याकडे असलेला BS-4 चा स्टॉक लवकर क्लिअर करावा असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे ग्राहक आधीपासून BS-4 किंवा BS-3 च्या कार वापरतात त्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऊर्जित पटेलांची आयएल अँड एफएसप्रकरणी चौकशी होणार:

 • इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस‘मधील (आयएल अँड एफएस) वित्तीय संकटाप्रकरणी एक संसदीय स्थायी समिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची येत्या 12 नोव्हेंबर रोजी चौकशी करणार आहे. बिगर बँकिंग वित्तसंस्थांच्या नियामकीय देखरेखीतील उणिवांसंदर्भात त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. urjit-patel
 • वित्तविषयक संसदीय स्थायी समिती ही चौकशी करणार आहे. समितीवरील एका वरिष्ठ सदस्याने सांगितले की, आयएल अँड एफएसमध्ये वित्तीय संकट कसे काय निर्माण झाले, कंपनीचे व्यवहार ठप्प होण्याइतपत हे संकट गंभीर कसे काय झाले, यासारखे प्रश्न पटेल यांना विचारले जाणार आहेत.
 • सूत्रांनी सांगितले की, वास्तविक अनियमित ठेव योजना प्रतिबंधक कायदा 2018 बाबत रिझर्व्ह बँकेची मते जाणून घेण्यासाठी पटेल यांना संसदीय समितीने बोलावले आहे. नोटाबंदीवरील रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालाबाबतही त्यांना प्रश्न विचारले जातील.
 • देशभरात लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीत बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी 99.3 टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने या अहवालात म्हटले आहे. त्याबरोबरच आयएल अँड एफएसमधील संकटाबाबतही त्यांच्याकडे विचारणा केली जाईल.

‘टाइम’च्या यादीवर भारतीय अमेरिकींचा ठसा:

 • जगप्रसिद्धटाइम‘ या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे.
 • अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे. दिव्या नाग, डॉ. राज पंजाबी आणि अतुल गावंडे अशी या तिघांची नावे आहेत.
 • ‘टाइम’ या नियतकालिकाचे आरोग्य संपादक आणि वार्ताहरांनी तब्बल महिनाभर अभ्यास केल्यानंतर या तिघांच्या नावांची शिफारस केली होती, यासाठी या तिघांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करण्यात आले होते.
 • आरोग्य क्षेत्रातील चार विविध श्रेणींमध्ये या तिघांनीही केलेल्या कामकाजाची दखल घेण्यात आली असून, यामध्ये जनआरोग्य, उपचार, किंमत आणि तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. या प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश असून, या सर्वांचे आरोग्यक्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे.

दिनविशेष:

 • सन 1861 मध्ये टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.
 • भारतात स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सन 1951 मध्ये सुरुवात झाली.
 • 25 ऑक्टोबर 1960 हा इडवस फर्ग्युसन कंपनी चे संस्थापकहॅरी फर्ग्युसन‘ यांचा स्मृतीदिन आहे.
 • युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश सन 1962 मध्ये झाला.
 • सन 1994 रोजी ए.एम. अहमदी यांनी भारताचे 26वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.