25 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
25 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 मे 2022)
भारत-अमेरिकेची प्रगत संरक्षण भागीदारी :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची मंगळवारी भेट झाली.
- दोन्ही देशांनी त्यांच्या अग्रगण्य सुरक्षा दलांसाठी विकसित होणाऱ्या तांत्रिकदृष्टय़ा प्रगत व गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या भागीदारीची घोषणा या वेळी केली.
- मोदी व बायडेन या दोन्ही नेत्यांनी या वेळी अधिक समृद्ध, संपन्न, सुसंवादी, सुरक्षित, मुक्त व परस्परांशी दृढ संबंध असलेल्या विश्वासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला.
- जपानमध्ये भारत-अमेरिका-ऑस्ट्रेलिया व जपानदरम्यान ‘क्वाड’ परिषद सुरू आहे.
- तर या वेळी भारत-अमेरिकेदरम्यानच्या दीर्घकालीन लस कृती कार्यक्रमास 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
- संयुक्त सैनिक दलांत भारताचा समावेश करण्याचे ‘व्हाइट हाउस’तर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धात आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी :
- भारताचा पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सुपरबेट जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) पोलंड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.
- आनंदने अतिजलद विभागात सोमवारी तीन विजयांची नोंद केली.
- तर त्याने 27व्या आणि अखेरच्या फेरीत रादोस्लाव्ह वोस्ताजेकला (पोलंड) पराभूत केले.
- तसेच त्याने रिचर्ड रॅपपोर्ट (हंगेरी) आणि किरिल शिव्हचेंको (युक्रेन) यांच्यावरही मात केली.
- मात्र, त्याला तीन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि त्याने तीन सामने गमावले. त्यामुळे या स्पर्धेच्या जेतेपदापासून त्याला वंचित राहावे लागले.
- पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडाने 24 गुणांसह या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
आशिया चषक हॉकी स्पर्धात जपानकडून भारताचा पराभव :
- सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या बरोबरीनंतर पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला मंगळवारी दुसऱ्या सामन्यात जपानकडून 2-5 अशा मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला.
- त्यामुळे या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताचा मार्ग आता खडतर झाला आहे.
- भारताचा पुढील सामना 26 मे रोजी इंडोनेशियाशी होणार आहे.
- तर बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय अनिवार्य असून त्यांना अन्य निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.
चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत प्रवेश :
- भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चीनच्या वे यीला 2.5-1.5 असे नमवत चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
- 16 वर्षीय प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत अनिश गिरीशी (हॉलंड) सामना होईल.
- अन्य उपांत्य लढतीत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनपुढे चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असेल.
- गिरी आणि कार्लसन यांनी उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे आर्यन टोरी (नॉर्वे) आणि डेव्हिड अॅन्टोन गुजारो (स्पेन) यांचा पराभव केला.
दिनविशेष :
- 25 मे : आफ्रिकन मुक्ती दिन
- शिवाजी महाराज आग्रा येथे 25 मे 1666 मध्ये नजरकैदेत होते.
- क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म सन 1886 मध्ये 25 मे रोजी झाला.
- स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा 25 मे 1899 रोजी जन्म झाला.
- कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच 25 मे 1955 मध्ये जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
- चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी 25 मे 1977 रोजी उठवली. सुमारे 10 वर्षे ही बंदी अमलात होती.
- विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना 1991चा ज्ञानपीठ पुरस्कार 25 मे 1992 रोजी जाहीर झाला.