25 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

एटीएम’ शुल्क तीन महिने माफ
एटीएम’ शुल्क तीन महिने माफ

25 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 मार्च 2020)

‘एटीएम’ शुल्क तीन महिने माफ :

  • खाते नसलेल्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आकारले जाणारे शुल्क पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे 30 जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले असले
  • तरी किरकोळ खरेदीसाठी रोख रकमेचा वापर होत असल्याने एटीएम वापरावरील शुल्क माफ करण्यात आले आहे.
  • याशिवाय, प्राप्तिकर, आयात शुल्क, दिवाळखोरी, करभरणा वाद आदी कालमर्यादांना मुदतवाढ देण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 मार्च 2020)

आधार-पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली :

  • आधार आणि पॅन क्रमांक जोडण्यासाठी यापूर्वी देखील वारंवार अंतिम तारखा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, यंदा ही तारीख वाढवण्यामागे करोनाचे संकट हे महत्वपूर्ण कारण आहे.
  • देशभरातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा-सुविधांशिवाय इतर कोणत्या सेवा-सुविधा सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आधार-पॅन लिंक केलेले नव्हते त्यांच्यासाठी अडचण निर्माण झाली होती.
  • दरम्यान, सीतारामण यांनी बुधवारी विविध क्षेत्रांसाठी दिलासा देणारे महत्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये कॉर्पोरेट्स, बँका, जीएसटी यांच्यासाठीच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, सीएसआर निधीचाही आता करोनाशी संबंधीत कामांसाठी वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

30 जूनपर्यंत आयकर परतावा भरता येणार :

  • करोनामुळे देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे काही क्षेत्रांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महत्वाच्या दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या.
  • यामध्ये 30 जूनपर्यंत आयकर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
    तर सितारामन म्हणाल्या, ‘विवाद ये विश्वास’ या योजनेची मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त
  • 10 टक्के भरण्याची गरज नाही.
  • तसेच नोटीस, अपिल, रिटर्न फायलिंग 30 जून पर्यंत करता येणार आहे. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2018-19 ज्यांनी रिटर्न फाईल केलेलं नाही त्यांना आता 31 मार्चऐवजी 30 जून 2020 पर्यंत रिटर्न फाइल करता येईल.
  • तसेच उशीरा रिटर्न फाईल करणार्यांसाठी व्याज हे 12 टक्क्यांवरुन 9 टक्के करण्यात आले आहे.

देशातील प्रवासी रेल्वेसेवा 14 एप्रिल पर्यंत बंद :

  • करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील प्रवासी रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी रेल्वे प्रशासनानं घेतला होता. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती.
  • तर आता रेल्वे प्रशासनानंही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी याबाबत घोषणा करण्यात आली.
  • तसेच प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
  • यापूर्वी रेल्वे प्रशासनानं 22 मार्च ते 31 मार्च दरम्यान मालगाड्या सोडून सर्व पॅसेंजर ट्रेन आणि मेल, एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये उपनगरीय सेवांचाही समावेश करण्यात आला होता.

अँटी मलेयरिया औषधावर निर्यातबंदी :

  • जगात आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या 500 च्या वर पोहचली आहे. अशात आता या रोगाचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्वीन या अँटी मलेरिया औषधाची निर्यात बंद करण्यात आली आहे.
  • तर हे औषध करोनाचा मुकाबला करण्यासाठी कामी येऊ शकते. या औषधाची मागणी वाढू शकते ही बाब लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
  • प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरस विरोधात प्रभावी ठरत असल्याचे अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.
  • तसेच 15 वर्षाच्या आतील मुलांवर हे औषध वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अ‍ॅडव्हायजरीनुसार नोंदणीकृत डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनवर लिहिले असेल तरच हे औषध मिळू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली.
  • मोदी म्हणाले, ‘जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे.
  • तर त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
  • देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘करोनाचं संकट परतवून लावण्यासाठी एकच पर्याय आहे. घरात राहणं. तुमची एक चूक तुमच्या घरापर्यंत करोनाला घेऊन शकतो. ज्यावेळी करोनाचा उद्रेक झाला.

दिनविशेष :

  • 25 मार्च 1898 रोजी शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
  • अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 मध्ये झाला.

[le id=”1″]

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.