25 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
25 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जून 2022)
डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ :
- मराठी व दखनी भाषेच्या स्नेहसंबंधावर संशोधनात्मक प्रकाशझोत टाकणारे प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा ‘भाषा सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
- एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय प्रा. आझम यांना शुक्रवारी कळवला आहे.
- प्रा. आझम अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी, उर्दू व फारसी भाषेचे सेवानिवृत्त विभागप्रमुख आहेत.
- त्यांचा ‘कदमराव पदमराव- दखनीचा आद्य काव्यग्रंथ- दखनी-मराठी अनुबंध’ हा संशोधनात्मक ग्रंथ सन 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला.
- त्यांची यापूर्वी ‘सुफी तत्त्वज्ञान स्वरूप व चिंतन’ ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा त्रिखंडात्मक, तसेच ‘नमाज-रहस्य व तत्त्वज्ञान’ असे तीन संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
निती आयोगाच्या ‘सीईओ’पदी परमेश्वरन अय्यर :
- निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला.
- अय्यर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 1981 च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी असून ते अमिताभ कांत यांची जागा घेतील.
- ते निती आयोगाचे तिसरे सीईओ असतील.
- भारत सरकारची सार्वजनिक धोरणे ठरविण्याचे काम निती आयोग करतो.
- निती आयोगाचे विद्यमान सीईओ कांत यांचा कार्यकाळ 30 जून 2022 रोजी संपुष्टात येत आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अय्यर यांच्या नियुक्तीला दोन वर्षे किंवा पुढील आदेश मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत मंजुरी दिली आहे.
अमेरिकेत महिलांचा गर्भपाताचा अधिकार रद्द :
- अमेरिकेत सुमारे 50 वर्षांपासून गर्भपाताला असलेले घटनात्मक संरक्षण शुक्रवारी संपुष्टात आले.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेतला असून साधारण निम्म्या राज्यांमध्ये आता गर्भपात बंदीची शक्यता आहे.
- गर्भपाताला घटनात्मक अधिकार ठरवणारा आपला 50 वर्षे जुना निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.
- ऐतिहासिक रो विरुद्ध वेड निर्णय रद्द करणार असल्याबाबतची कागदपत्रे फुटल्यानंतर काही आठवडय़ातच सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
- या निर्णयामुळे अमेरिकेत गर्भपाताच्या अधिकारांचे रूपांतर होईल आणि राज्ये त्याबाबतच्या प्रक्रियेवर बंदी घालू शकतील.
द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल :
- राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली आहे. येत्या 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
- एनडीए आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
- भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल होत्या. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत ज्या भारताच्या सर्वोच्चपदाची निवडणूक लढवत आहेत.
आठ वर्षांच्या मुलाने 18 मिनिटांत पार केली यमुना :
- शिवांश मोहिले नावाच्या या आठ वर्षांच्या मुलाने यमुनेच्या पाण्यात उतरून विक्रम केला आहे.
- त्याने अवघ्या 18 मिनिटांत यमुना नदी पार केली आहे.
- 18 मिनिटांमध्ये यमुना पार करणारा शिवांश पहिलाच मुलगा ठरला आहे.
- त्यापूर्वी, आराध्य श्रीवास्तव नावाच्या मुलाने 22 मिनिटांमध्ये यमुना पार केली होती.
स्पेनचा अल्वारो वॅझकेझ खेळणार विराट कोहलीच्या संघात :
- फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आयपीएलच्या धर्तीवर ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल) स्पर्धेची सुरुवात केली आहे.
- या स्पर्धेमुळे विविध देशांतील प्रतिभावान फुटबॉलपटू भारतामध्ये येऊन फुटबॉल खेळताना दिसतात.
- नुकतेच विराट कोहलीची सहमालकी असलेला संघ, एफसी गोवाने स्पेनचा प्रतिभावंत फुटबॉलपटू अल्वारो वॅझकेझ याला दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे.
- त्यामुळे 2024 च्या हंगामापर्यंत अल्वारो गोव्याच्या ऑरेंज जर्सीमध्ये खेळताना दिसेल.
- स्ट्रायकर असलेला अल्वारो यापूर्वी केरळ ब्लास्टर्स या संघाकडून खेळत होता.
दिनविशेष :
- 25 जून हा दिवस ‘जागतिक कोड त्वचारोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
- कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा 25 जून 1918 मध्ये जारी केला.
- 25 जून 1947 रोजी द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
- पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 मध्ये देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती.
- सन 1983 मध्ये भारताने प्रथम क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.