25 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

सुनील गावसकर
सुनील गावसकर

25 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 जुलै 2022)

देशात लवकरच सैन्यदलांची संयुक्त कमांड :

  • देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची ‘जॉईन्ट थिएटर कमांड’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली.
  • त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश ही ओळख पुसत भारताची वाटचाल ही सर्वाधिक शस्त्रनिर्यात करणारा देश होण्याकडे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
  • देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जम्मूतील गुलशन मैदानावर जम्मू काश्मीर पीपल्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
  • कारगिरमधील ऑपरेशन विजय अंतर्गत झालेल्या संयुक्त मोहिमा लक्षात घेता देशात जॉईन्ट थिएटर कमांडची संकल्पना राबविली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जुलै 2022)

केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल :

  • केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे.
  • आता दिवस-रात्र म्हणजे 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे.
    तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.
  • ‘आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली आहे.
  • तर या मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे.
  • भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये 20 जुलै 2022 च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे.
  • ध्वज संहिता-2002 आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-1971 अंतर्गत राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम सांगण्यात आले आहेत.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात नीरजची रौप्यक्रांती :

  • ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राने रविवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले.
  • जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष अ‍ॅथलेटिक्सपटू ठरला आहे.
  • तर चौथ्या प्रयत्नात नीरजने सर्वोत्तम 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला.
  • तसेच ही कामगिरी ग्रेनाडाच्या 2019 मधील दोहा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अँडरसन पीटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकाची ठरली.
  • भारतीय संघ संयुक्तपणे 28व्या क्रमांकावर आहे.
  • एक रौप्य आणि पाच क्रीडापटू अंतिम फेरीत ही भारताची जागतिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

इंग्लंडमधील क्रिकेट मैदानाला देण्यात आले भारतीय खेळाडूचे नाव :

  • इंग्लंडमधील एका क्रिकेट मैदानाला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे.
  • इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटला इंग्लंडमध्ये मोठा मान मिळाला आहे.
  • लिसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे.
  • शनिवारी हे नाव देण्यात आले. इंग्लंडमधील एखाद्या क्रिकेट मैदानाला ​​भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • लिसेस्टर क्रिकेट मैदानाचे नाव बदलण्याची मोहीम भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी सुरू केली होती.
  • यापूर्वी, अमेरिकेतील केंटकी येथील एका मैदानाला ‘सुनील गावस्कर फील्ड’असे नाव देण्यात आलेले आहे.
  • याशिवाय टांझानियातील जंजीबारमध्येही ‘सुनील गावसकर क्रिकेट स्टेडियम’तयार केले जात आहे.

दिनविशेष :

  • 25 जुलै 1880 हा दिवस समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते ‘गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका‘ यांचा स्मृतीदिन आहे.
  • किकूने इकेदा यांनी सन 1908 मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
  • जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राऊन यांचा 25 जुलै 1978 मध्ये इंग्लंड येथे जन्म झाला.
  • 25 जुलै 1997 मध्ये के.आर. नारायणन भारताचे 10वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
  • सन 2007 मध्ये श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.