25 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

25 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जुलै 2020)
मागील दोन दिवसांत देशात एक लाख रुग्णांची वाढ:
- भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून भारतात 45 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे तर 750 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे.
- मागील 24 तासांत देशात 48 हजार 962 करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 757 जणांचा मृत्यू झाला आहे.
- त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 13 लाख 36 हजार 874 इतकी झाली आहे. तर 31 हजार 413जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांत देशात एक लाख रुग्णांची वाढ झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):
रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द- डोनाल्ड ट्रम्प:
- रिपब्लिकन पक्षाचे जॅक्सनव्हिल येथे होणारे अधिवेशन करोना विषाणूच्या प्रसारामुळे रद्द करण्यात आले आहे, हे अधिवेशन पुढील महिन्यात होऊन त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार होती.
- तर 24-27 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन होणार होते. आता हे अधिवेशन पूर्ण स्वरूपात होणार नाही.
- व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार जास्त असल्याने जॅक्सनव्हिल येथील अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या अधिवेशनासाठी ही योग्य वेळ नाही कारण फ्लोरिडात करोनाचा प्रसार जास्त आहे.
- फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार झाला असून त्या राज्यात 3,89,868 रुग्ण आहेत. कॅरोलिना व न्यूयॉर्क पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतात 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला कोरोनाचा पहिला डोस:
- भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
- इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
- भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.
- स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे.
- डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित 30 वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात- केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:
- सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल, अशी आशा आहे. जेणेकरून करोनाच्या संकटानंतर लोकांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
- मे महिन्याच्या अखेरीस क्रीडामंत्र्यांनी ऑलिम्पिकशी संबंधित काही खेळांची सराव शिबिरे सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
- ‘‘भविष्यात लवकरच क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल. ठरावीक मर्यादा आखून योग्य कार्यप्रणालीसह काही स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाईल.
- विशेष सराव सत्रांमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू सराव करत आहेत, याचा मला आनंद आहे,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.
- राष्ट्रकुल देशांच्या परिषदेदरम्यान रिजिजू यांनी करोनानंतर भारताच्या क्रीडा कार्यक्रमांना कशी सुरुवात करता येईल, याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘‘सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाच्या क्रीडामंत्र्यांशी चर्चा करून मी हळूहळू क्रीडाविषयक घडामोडी सुरू करण्यास सांगितले आहे. काही खेळांच्या लीग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात येतील.’’
दिनविशेष :
- 25 जुलै 1880 हा दिवस समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते ‘गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका‘ यांचा स्मृतीदिन आहे.
- किकूने इकेदा यांनी सन 1908 मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
- जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राऊन यांचा 25 जुलै 1978 मध्ये इंग्लंड येथे जन्म झाला.
- 25 जुलै 1997 मध्ये के.आर. नारायणन भारताचे 10वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
- सन 2007 मध्ये श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.