25 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
25 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 डिसेंबर 2021)
Single Sign On पोर्टलसाठी सरकारचा पुढाकार :
- लवकरच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वेबासाइटसाठी वेगवेगळे यूजर नेम आणि पासवर्ड ठेवण्याची गरज नाही.
- तर एकाच लॉगिनने सर्व कामे होतील, त्याचप्रमाणे सर्व माहिती एकाच वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.
- सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय डिजिटल प्रोफाइल तयार करण्यात येत आहे.
- तसेच कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक वेळी कागदपत्रे दाखवण्याची, फॉर्म भरण्याची गरज नाही.
- तर प्रत्येक वेळी आयडी, पासवर्ड, पॅन, बँक खाते, टीआयएन, टॅन, जीएसटीएन, आरटीओ, विमा क्रमांक यासारख्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.
- यासाठी सरकार सर्व सरकारी सेवांसाठी पोर्टल आणि अॅप आणणार आहे. या पोर्टलचे नाव सिंगल साइन ऑन असेल. नॅशनल सिंगल साइन-ऑनवर सर्व नागरिक सेवा केंद्र आणि राज्य सेवांमध्ये एकत्रित केल्या जातील.
- त्याच वेळी, UMANG कडे http://www.india.gov.in सोबत नॅशनल सिंगल साइन-ऑन (SSO) मोबाइल अॅप्लिकेशन राष्ट्रीय सिंगल साइन-ऑन वेबपेजच्या स्वरूपात असेल.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला पुन्हा मान्यता :
- जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) पुन्हा मान्यता बहाल केली आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
- जागतिक स्तराच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे 2019मध्ये ‘वाडा’कडून या प्रयोगशाळेला निलंबित करण्यात आले होते.
- ‘वाडा’ने जाहीर केलेल्या उत्तेजक सेवन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. या यादीत रशिया अव्वल स्थानी आहे.
- निलंबनाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यास मनाई करण्यात आली होती.
- परंतु या कालावधीत चाचण्यांचे नमुने ‘वाडा’ची मान्यता असलेल्या दोहा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते.
हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा :
- कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
- 41 वर्षीय ऑफ-स्पिनर हरभजनची भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते.
- तर त्याने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 ट्वेन्टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 417, 269 आणि 25 मोहरे टिपले.
- 1998मध्ये शारजा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजनने मार्च 2016मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारताकडून अखेरचा सामना खेळला.
माजी गोलरक्षक सनत सेठ यांचे निधन :
- भारताचे माजी गोलरक्षक सनत सेठ यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
- 1949मध्ये ईस्टर्न रेल्वे एफसी संघाकडून सेठ यांनी कारकीर्दीला प्रारंभ केला. नंतर ते आर्यन क्लबकडून खेळू लागले.
- 1957मध्ये ईस्ट बंगाल संघाने सेठ यांना स्थान दिले. मात्र वर्षभरातच त्यांनी मोहन बगान संघात स्थान मिळवले. या संघाकडून ते सहा वर्षे खेळले.
- 1953 आणि 1955 मधील संतोष करंडक विजेत्या बंगाल संघात त्यांचा समावेश होता.
- तर सेठ यांनी 1954मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
दिनविशेष:
- 25 डिसेंबर हा दिवस ‘नाताळ‘, चांगले शासन दिन तसेच तुलसी पूजन दिन म्हणून साजरा केला जातो.
- बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक ‘पंडित मदन मोहन मालवीय‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 मध्ये झाला होता.
- भारताचे 10वे पंतप्रधान ‘अटलबिहारी वाजपेयी‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
- सन 1976 मध्ये आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली.
- वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी सन 1990 मध्ये करण्यात आली.