25 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

FASTAG
FASTAG

25 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2020)

वाहनांना ‘या’ तारखेपासून FASTAG बंधनकारक :

  • देशातील प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून FASTAG असणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
  • FASTAGची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील.
  • FASTAG ही संकल्पना 2016पासून सुरू करण्यात आली. चार अधिकृत बँकांनी सुमारे लाखभर वाहनधारकांना FASTAG वितरित केले.
  • तर 2017 मध्ये हाच आकडा वाढून सात लाखांपर्यंत गेला. आणि 2018च्या अंती हा आकडा 34 लाखांवर जाऊन पोहोचला.
  • दरम्यान, फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक sms त्यांच्या मोबाईलवर येईल.
  • अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2020)

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय :

  • कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार आहे.
  • तर हे प्राणी संग्रहालय गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात येणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
  • रिलायन्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच सपरटणारे प्राणीही पर्यटकांना पाहता येणार आहेत.
  • तर विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील वेगेगवेळ्या भागांमधील प्राणी या संग्रहालयामध्ये असतील असं सांगण्यात आलं आहे.
  • तसेच हे प्राणीसंग्रहालय 280 एअर परिसरावर निर्माण केलं जाणार आहे. जामनगरमधील मोती खावेडी येथे रिलायन्सचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे. या ठिकाणापासूनच जवळच हे प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे.
  • तर रिलायन्सचा हा रिफायनरी प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.

बास्केटबॉलपटू सतनामवर दोन वर्षांची बंदी :

  • 2015मध्ये नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये (एनबीए) खेळणारा पहिला भारतीय बास्केटबॉलपटू ठरलेल्या सतनाम सिंग भामरा याच्यावर उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) दोन वर्षांची बंदी घातली आहे.
  • तर गेल्या वर्षी उत्तेजक चाचणीत भामरा दोषी ठरला होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून त्याच्यावर तात्पुरती बंदी लादण्यात आली होती.
  • ‘नाडा’च्या उत्तेजकविरोधी शिस्तपालन समितीसमोर त्याची सुनावणी झाली. त्यावेळी शिस्तपालन समितीने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली.

निवड समितीचं अध्यक्षपद चेतन शर्मा यांच्याकडे :

  • भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत.
  • तर अबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती हे निवड समितीचे सदस्य असणार आहेत. सर्वाधिक सामने खेळणाऱ्या मराठमोळ्या अजित आगकरचीच निवड करण्यात आलेली नाही.
  • भारतीय संघाच्या निवड समितीसाठी आगरकरबरोबरच चेतन शर्मा, मनिंदर सिंग, अबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते.

दिनविशेष:

  • 25 डिसेंबर हा दिवस ‘नाताळ‘, चांगले शासन दिन तसेच तुलसी पूजन दिन म्हणून साजरा केला जातो.
  • बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक ‘पंडित मदन मोहन मालवीय‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 मध्ये झाला होता.
  • भारताचे 10वे पंतप्रधान ‘अटलबिहारी वाजपेयी‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
  • सन 1976 मध्ये आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली.
  • वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी सन 1990 मध्ये करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.