25 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

25 December 2018 Current Affairs In Marathi

25 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2018)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 रुपयांचे नाण्याचे अनावरण:

 • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे. 100 rupees coin
 • वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर हा दिवस केंद्र सरकारकडूनसुशासन दिवसम्हणून साजरा केला जाणार आहे. संसदेच्या अॅनेक्सी भवनात मोदींनी या नाण्याचे अनावरण केले.
 • 100 रुपयांच्या नाण्याच्या पुढील भागात अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिले आहे. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि रोमन अक्षरांत INDIA असे लिहिले आहे.
 • प्रतिक चिन्हाच्याखाली 100 असे नाण्याचे मुल्य लिहिले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आणि देवनागरी व रोमन लिपीमध्ये त्यांचे नाव लिहिलेले आहे. तसेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूचे वर्ष 1924-2018 लिहिले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2018)

जीएसटीतील 28 टक्क्यांची कररचना होणार रद्द:

 • वस्तू आणि सेवा करांतील (जीएसटी) 28 टक्क्यांची कररचना लवकरच रद्द करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत.
 • देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर 18 महिन्यांनंतर अर्थमंत्र्यांनी भविष्यात ही कररचना पूर्णपणे संपवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या ब्लॉगद्वारे जेटलींनी याची माहिती दिली.
 • जेटलींनी म्हटले की, 12 आणि 18 टक्के कर रचना एकत्र करुन एक नवी कररचना तयार करण्यात येईल. त्यानंतर देशात केवळ तीनच कररचना अस्तित्वात राहतील. यामध्ये 0 टक्के, 5 टक्के आणि नवी कररचना यांचा समावेश असेल. मात्र, हा बदल तेव्हाच शक्य होईल जेव्हा जीएसटीतून होणारे महसुली उत्पन्न एक लाख कोटी रुपयांच्या पार जाईल.
 • आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहीताना जेटली म्हणतात, सध्या तंबाखूजन्य उत्पादन, वातानुकूलीत यंत्रणा, एसयुव्ही सारखी लक्झरी वाहने, मोठे टीव्ही, डिशवॉशरसह सिमेंट आणि ऑटो पार्टस अशा उत्पादनांचा समावेश 28 टक्क्यांच्या कररचनेत आहे.
 • तसेच या उत्पादनांनाही भविष्यात 28 टक्क्यांच्या कररचनेतून बाहेर ठेवण्यात येणार आहे. इमारत बनवण्यासाठी लागणाऱी अधिक उत्पादने ही 18 आणि 12 टक्क्यांच्या कररचनेत आणण्यात आली आहेत.

भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल वाहतुकीसाठी सज्ज:

 • अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला भारतातील सर्वात लांब रेल्वे रुळ अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार असून हा देशातील सर्वात लांब रेल्वेच्या मार्गावरील पूल असेल असे सांगितले जात आहे. brige
 • तर या पूलाची लांबी 4.9 किमी असून तो ईशान्य भारतात बांधण्यात आला आहे. या पूलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचे सुमारे 10 तास वाचणार आहेत. तब्बल 21 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाचे भुमिपूजन झाले होते. मात्र त्याचे काम पूर्ण होण्यास इतका मोठा कालावधी गेला.
 • आसाममध्ये असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधण्यात आला असून त्याचे नाव बोगीबील असे ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आणि सुशासन दिवसाच्या निमित्ताने या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
 • आतापर्यंत प्रवाशांना आसाम ते अरुणाचल प्रदेश असा प्रवास करायचा असेल तर बऱ्याच रेल्वे बदलाव्या लागत होत्या. तसेच यामध्ये खूप वेळही वाया जात होता. मात्र आता या पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि प्रवास अतिशय सुलभ होणार आहे. भारतातील पायाभूत सोयीसुविधा सुधारण्याच्यादृष्टीने हा पूल उभारणे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

नवाज शरीफ यांना सात वर्षांचा तुरुंगवास:

 • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने पनामा पेपर्स गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या अल-अजीजिया स्टील मिल भ्रष्टाचारप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसेच, ‘पनामा पेपर्स’शी संबंधित फ्लॅगशिप गुंतवणूक भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
 • पाकिस्तानातील भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मुहंम्मद अर्शद मलिक यांनी हा निकाल दिला. आपल्या वकिलांसह शरीफ यांचे न्यायालयात आगमन झाल्यानंतर न्यायाधीशांनी निकालाचे वाचन केले.
 • ‘पनामा पेपर्स’शी संबंध असलेले गैरव्यवहाराचे तीन खटले शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात सुरू आहेत. अल-अजीजिया गैरव्यवहारप्रकरणी शरीफ यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचे स्पष्ट करत त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तसेच, शरीफ यांना 2.5 दशलक्ष डॉलरचा दंडही करण्यात आला आहे.

आता सोशल मीडियावर राहणार सरकारची नजर:

 • केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकताच एका आदेशाद्वारे सर्व सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लोकांच्या खासगी संगणकातील डेटावर नजर ठेवण्याचा, पडताळणीचा अधिकार दिला आहे.
 • सरकारच्या म्हणण्यानुसार, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कलम 69 नुसार जर सुरक्षा एजन्सीला कोणत्याही संस्था अथवा व्यक्तीवर देशविरोधी कारवायांमध्ये सामिल असल्याचा संशय असेल तर ते त्यांच्या संगणातील उपलब्ध डेटाची पडताळणी करुन त्याच्यावर कारवाई करु शकतात. social media
 • त्याचबरोबर सरकार आता सुचना आणि माहिती अधिनियमनाच्या कलम 79 नुसार, याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. तसेच हे कलम देशभरात वापरात असलेल्या सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मला लागू होईल. हा अधिनियम लागू झाल्यानंतर फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, शेअर चॅट, गुगल, अॅमेझॉन आणि याहू साऱख्या कंपन्यांना सरकारद्वारा विचारण्यात आलेल्या कोणत्याही मेसेजसंदर्भात संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
 • उदाहरणादाखल जर सरकारला कोणत्याही मेसेज, व्हिडिओ किंवा फोटोवर जर आक्षेप किंवा संशय असेल तर अशा मेसेजेसबाबत सरकार सोशल मीडिया कंपन्यांकडून माहिती मागवेल त्यानंतर या कंपन्यांना एंड टू एंड एन्क्रिप्शन तोडून मेसेजबाबत सरकारला पूर्ण माहिती द्यावी लागेल.

दिनविशेष:

 • 25 डिसेंबर हा दिवसनाताळ‘, चांगले शासन दिन तसेच तुलसी पूजन दिन म्हणून साजरा केला जातो.
 • बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापकपंडित मदन मोहन मालवीय‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 मध्ये झाला होता.
 • भारताचे 10वे पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
 • सन 1976 मध्ये आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली.
 • वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी सन 1990 मध्ये करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.