25 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
25 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2022)
वन्यप्राणी हल्ल्यात मृत, जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ :
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास अथवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम वाढवण्यात आली आहे.
- वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी व पशुधन हानी झाल्यास पूर्वी असलेल्या अर्थसहाय्याच्या तुलनेत वाढवण्याचा निर्णय राज्याच्या महसूल व वनखात्याने घेतला आहे.
- वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी दहा लाख रुपये तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित दहा लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी मुदत ठेव व उर्वरित पाच लाख रुपये दहा वर्षांसाठी मुदत ठेव स्वरजपात राहील.
- कायम अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, गंभीररित्या जखमी झाल्यास एक लाख 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
- व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी खर्च देण्यात येईल. मात्र, खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा 20 हजार रुपये प्रती व्यक्ती राहील.
Must Read (नक्की वाचा):
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’योजनेला दोन महिने मुदतवाढ :
- राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात विविध घटकांतील सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे.
- त्यामुळे गणेशोत्सव आणि दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणी व वितरणासाठी 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
- एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडय़ामध्ये 25 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते.
- या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली.
- त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती :
- राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
- विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली.
- देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
टोलवसूलीसाठी नितीन गडकरींनी सांगितली ‘ही’ नवी योजना :
- राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके बंद करून त्याऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा (ANPR)बसवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
- यासाठीचा चाचणी प्रकल्प ( Pilot Project) सुरू करण्यात आला असून यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
- चारचाकी गाड्यांमध्ये कंपनीने फीट केलेल्या नंबरप्लेट बसवण्याचा निर्णय 2019 मध्ये केला होता.
- आता टोलनाके काढून स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्यात येणार आहे.
- हे कॅमेरे गाडीच्या नंबरप्लेटवरील नंबर वाचून त्याला जोडण्यात आलेल्या बॅंक खात्यातून पैसे वजा होतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलची उडी :
- बुधवारी ‘आयसीसी’ने एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली.
- या क्रमवारीत भारताच समामीवीर फलंदाज शुभमन गिल 45 स्थानांनी झेप घेत 38व्या स्थानावर पोहोचला आहे.
- दरम्यान, या क्रमवारीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. तर कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.
- शिखर धवनला एका स्थानाचा फटका बसला असून तो 12व्या स्थानावर आहे.
- या क्रमावारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा रुसी व्हॅन डर डुसेन दुसऱ्या स्थानावर आहे.
- गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर आहे. तर भारताचा जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे.
- तसेच बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या दहामध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.
दिनविशेष :
- जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सन 1919 मध्ये लंडन ते पॅरिस सुरू झाली.
- साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 मध्ये झाला.
- झिम्बाब्वेचा सन 1980 मध्ये संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
- सन 1998 मध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.