25 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड:
इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड:

25 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2020)

मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती.
 • सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली.
 • आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखबालीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समुहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 • अदानी समुहाचा जीव्हीके समुहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
 • सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समुहाकडे आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2020)

डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार घोषित:

 • या वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून माईक पेन्स यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
 • तर यंदा ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रेटिक पार्टीकडून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन मैदानात आहेत.
 • रिपब्लिकन पार्टीच्यावतीनं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी सोमवारी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
 • यामध्ये ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड:

 • भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 • 31 वर्षीय इशांत शर्मा सध्या आयपीएलच्या निमीत्ताने युएईत आहे.
 • गेल्या 13 वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ मला अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं असल्याचं इशांत म्हणाला.
 • इशांतसोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

बायर्न म्युनिक अजिंक्य- चॅम्पियन्स लीग फुटबॉल:

 • युरोपियन फुटबॉलचा नवीन राजा बायर्न म्युनिक ठरला आहे.
 • चॅँपियन्स लीगचे विजेतेपद पटकावून बायर्न म्युनिकने युरोपातील फुटबॉलवर सध्या त्यांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.
 • बायर्न 11 चॅँपियन्स लीग लढती एका हंगामात जिंकणारा पहिला संघ ठरला.

दिनविशेष :

 • जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सन 1919 मध्ये लंडन ते पॅरिस सुरू झाली.
 • साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 मध्ये झाला.
 • झिम्बाब्वेचा सन 1980 मध्ये संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
 • सन 1998 मध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.