25 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

25 August 2018 Current Affairs In Marathi

25 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2018)

बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर:

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा (Maharashtra Board HSC Exam Supplementary Result 2018) निकाल 24 ऑगस्ट रोजी जाहीर झाला.
 • परीक्षा दिलेल्या 1 लाख 2 हजार 160 विद्यार्थ्यांपैकी 22.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. HSC
 • बारावीच्या मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी देण्यासाठी 17 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान राज्यभरात फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
 • यंदा लातूर विभागातील सर्वाधिक म्हणजेच 31.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यात परीक्षेसाठी बसलेल्या एकूण 1 लाख 2 हजार 160 विद्यार्थ्यांपैकी 22.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जुलै 2017 मधील फेरपरीक्षेची टक्केवारी 24.96 आणि 2016 मध्ये 27.03 टक्के होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2018)

‘पीएमआरडीए’ची क्षेत्रीय कार्यालये सुरू होणार:

 • शहराच्या हद्दीबाहेर घर खरेदी करावयाचे आहे. त्या बांधकामाला परवानगी घेतली आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयात जाऊन माहिती घेण्याची आता गरज राहणार नाही.
 • कारण प्राधिकरणाकडून लवकरच पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या क्षेत्रीय कार्यालयांत बांधकाम परवानगीसह विविध कामे नागरिकांना मार्गी लावत येणार आहे.
 • महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊ लागली आहेत; परंतु अशा बांधकामांना परवानगी आहे की नाही, याची पुरेशी कल्पना सर्वसामान्य नागरिकांना नसते. त्यामुळे अनेकांची फसवणूक होण्याची शक्‍यता असते. PMRDA
 • पीएमआरडीएने अधिकृत बांधकामे आणि अनधिकृत बांधकामांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे; परंतु त्याची कल्पना नागरिकांना नाही. त्यामुळे पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात कार्यक्षेत्राच्या हद्दीत पाच ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तसेच या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे की नाही, येथपासून बांधकाम परवानगीसाठी अर्ज तसेच पीएमआरडीएच्या संबंधित जी कामे असतील, ती कामे या क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

अमेरिकेची स्पर्धात्मकता संकटात:

 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक असुसंगत धोरणांचा अमेरिकेच्या स्पर्धात्मकतेवर विपरीत परिणाम होत असल्याची टीका तेथील बिझनेस राऊंडटेबल या कंपन्यांच्या प्रमुखांच्या संघटनेने केली आहे.
 • भारत आणि चीनसारख्या देशांतून हजारोच्या संख्येने प्रशिक्षित मनुष्यबळ अमेरिकेत येत असून ते अमेरिकेच्या विकासाला हातभार लावत आहेत.
 • ट्रम्प यांच्या एच-1 बी व्हिसा धोरणांत सुसंगती नसल्याने या स्थलांतरितांमध्ये अस्थिरतेची भावना आहे. त्यामुळे ते अमेरिका सोडून अन्य देशांत जाण्याची शक्यता आहे. तसे मोठय़ा प्रमाणावर घडल्यास जागतिक बाजारपेठेत आणि औद्योगिक क्षेत्रात अमेरिकेची स्पर्धात्मकता घटू शकते, असे या संघटनेने म्हटले आहे.
 • तसेच यामध्ये अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक, पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी, मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा आणि सिस्को सिस्टीम्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स आदींचा समावेश आहे.
 • अमेरिकेतील अनेक कंपन्या आणि परदेशांतून येणारे कामगार एच-1 बी व्हिसाचा गैरवापर करून अमेरिकी नागरिकांचे रोजगार हिरावून घेत आहेत, असा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे. हा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षभरात अनेक वेळा व्हिसा आणि स्थलांतर नियमांत बदल केले आहेत.

मुंबई विद्यापीठाची माहिती आता एका क्लिकवर:

 • मुंबई विद्यापीठातील विविध कार्यकम, शैक्षणिक योजना, तसेच परीक्षांचे वेळापत्रक या सर्व बाबी आता महाविद्यालयीन प्राचार्य आणि विद्यार्थ्यांच्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. यासाठी विद्यापीठाने ई-सुविधा नावाचे मोबाइल अ‍ॅप सुरू केले असून, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. याच्या पहिल्या टप्प्यात विद्यापीठाशी संलग्नित 791 महाविद्यालयांतील 6 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
 • विद्यार्थी प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतची सर्व सुविधा यावर उपलब्ध असेल. यासाठी 16 अंकांचा पीएनआर क्रमांक विद्यार्थ्यांना पासवर्ड म्हणून देण्यात येईल. हे अ‍ॅप विद्यार्थी त्यांच्या पीआरएन क्रमांकाशी जोडून वापरू शकतील. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल. Mumbai University
 • दरम्यान, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांसोबत कुलगुरूंनी बैठक घेतली. या वेळी विद्यापीठामधील विद्यानगरी कॅम्पसमध्ये संशोधनासाठी एनक्युबेशन केंद्र स्थापन करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 • तसेच विद्यापीठाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने फोर्ट आणि कलिना परिसराची व्हर्च्युअल सफर घडविणारी लिंक तयार केली आहे. यामध्ये या दोन्ही ठिकाणांवरील विविध विभागांच्या इमारतींचे फोटो, माहिती मिळेल. ती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन:

 • ऑस्ट्रेलियाच्या लिबरल पक्षामध्ये पंतप्रधान माल्कम टर्नबल यांच्याविरोधात बंड झाल्यानंतर, आता पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रदानपदाची शपथ घेतली आहे. पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीमध्ये मॉरिसन यांनी माजी गृहमंत्री पीटर डटन यांचा पराभव केला.
 • टर्नबल यांनी गेल्या आठवड्यामध्ये उर्जा कपातीसाठी एक ठराव आणला होता. यामध्ये विजेचे दर कमी करतानाच, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कार्बन उत्सर्जनामध्ये कपात करण्याचे उपाय होते. त्यावरून पक्षामध्ये त्यांच्याविरोधात बंड झाले आणि बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी त्यांच्याऐवजी अन्य नेत्याची निवड करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर टर्नबल यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
 • तसेच त्यामुळे नव्या नेतेपदासाठी टर्नबल सरकारमधील अर्थमंत्री मॉरिसन आणि डटन यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यात मॉरिसन यांना 45, तर डटन यांना 40 मते मिळाली. ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, त्यामध्ये मॉरिसनच पक्षाचे नेतृत्व करणार आहेत.

दिनविशेष:

 • जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सन 1919 मध्ये लंडन ते पॅरिस सुरू झाली.
 • साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 मध्ये झाला.
 • झिम्बाब्वेचा सन 1980 मध्ये संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
 • सन 1998 मध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.