24 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

24 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2021)

देशात प्रत्येकाला मिळणार डिजिटल हेल्थ कार्ड :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान (PM-DHM) योजना सुरू करणार आहेत.
 • पूर्वी ही योजना नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (NDHM) या नावाखाली सुरू होती.
 • प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान, माहिती आणि पायाभूत सुविधांच्या विस्तृत श्रेणीद्वारे कार्यक्षम, प्रवेशयोग्य, सर्वसमावेशक, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने सार्वत्रिक आरोग्य संरक्षण प्रदान करते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन योजना आता देशभरात विस्तारित होणार आहे.
 • तर या अंतर्गत, लोकांची डिजिटल आरोग्य ओळखपत्रे बनवली जातील.

वायू प्रदूषणाबाबत WHO ने जाहीर केली नवीन गुणवत्ता पातळी :

 • WHO ने वायू प्रदूषणाबाबत नवीन स्तर, नवीन गुणवत्ता पातळी जाहिर केली आहे.
 • प्रदूषकांच्या आकडेवारीचा नवा स्तर हा आरोग्यासाठी गृहित धरावा असे WHO सांगितलं आहे.
 • तर याआधी WHO ने 2005 मध्ये वायू प्रदूषणाबाबतचे विविध स्तर हे निश्चित केले आले होते.
 • आता 16 वर्षानंतर WHO ने हवेतील गुणवत्तेबाबत, प्रदूषणाबाबत नवीन स्तर जाहिर केले आहेत.
 • सुरुवातीला PM 2.5 (particulate matter) या प्रदुषकाचा हवेतील मधील एका क्बुविक मीटरमागे 25 मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुरक्षित समजला जायचा.
 • तर आता बदललेल्या स्तरानुसार 15 मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुद्धा सुरक्षित नसल्याचं WHO ने जाहिर केलं आहे.
 • वायू प्रदूषणामध्ये जी सहा सर्वसाधारण प्रदूषके ही गृहित धरली जातात त्या सर्वांचा हवेतील गुणवत्ता स्तर हा बदलवण्यात आला आहे.
 • PM2.5, PM10, ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांच्या हवेतील गुणवत्ता स्तरामध्ये बदल करण्यात आले आहेत.

बायडेन यांचा भारताला‘या’गोष्टीसाठी दिला नकार :

 • अमेरिकेने भारताला किंवा जापानला ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसोबत तयार करण्यात आलेल्या ‘ऑकस’ (ए-यूके-यूएस) या त्रिराष्ट्रीय आघाडीमध्ये सहभागी करुन घ्यायला नकार दिलाय आहे.
 • तर नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यासोबत हिंद-प्रशांत महासागरामधील सुरक्षेच्या दृष्टीने या आघाडीची स्थापना केलीय.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेबरोबरच क्वाड देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले असून त्याच दिवशी अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने घेतलेला हा निर्णय भारतासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
 • ऑस्ट्रेलियाला सामरिकदृष्ट्या किमान सक्षम करण्यासाठी या नवीन कराराअंतर्गत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान आणि अणुइंधन परिचालित पाणबुड्या देण्याचा निर्णय जो बायडेन प्रशासनाने घेतला आहे.
 • फ्रान्सला या नवीन आघाडीमध्ये सहभागी करुन घेता येणार नाही हे बायडेन यांनी आधीच स्पष्ट केल्याचा उल्लेख साकी यांनी केला.

पुढच्या महिन्यात जाहीर होणार वेळापत्रक :

 • राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता आयोगाने पटापट सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे.
 • तर मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढच्या वर्षात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं आयोगाने सांगितलं असून तसेच प्रलंबित निकाल 30 सप्टेंबरपर्यंत लावण्याचे देखील नियोजन आयोगाकडून केलं जात आहे.
 • तसेच परिपत्रक जारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही माहिती दिली आहे.

प्रिसिजनने बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस :

 • जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे.
 • वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
 • प्रिसिजनने डिझेलवर धावणाऱ्या 23 आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले आहे.
 • मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.
 • तर ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये 180 किलोमीटर धावेल.
 • पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संस्थेने या बसची चाचणी केली आहे.

दिनविशेष:

 • भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 मध्ये झाला.
 • महात्मा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
 • सन 1932 मध्ये पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
 • 24 सप्टेंबर 1948 रोजी होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली.
 • सन 1960 मध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या यू.एस.एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
 • माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 2007 या वर्षी भारताने टी-20 विश्वकप जिंकला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.