24 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

US Presidential Election 2020 बॅलेटवर गुजराती, हिंदीसहीत सहा भारतीय भाषा:
US Presidential Election 2020 बॅलेटवर गुजराती, हिंदीसहीत सहा भारतीय भाषा:

24 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2020)

US Presidential Election 2020 बॅलेटवर गुजराती, हिंदीसहीत सहा भारतीय भाषा:

 • अमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार मोठ्या संख्ये आहेत. त्यामुळेच भारतीयांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही मोठ्या पक्षांनी प्रयत्न सुरु केलेत.
 • याचा प्रत्यय सध्या निवडणुकींच्या बॅलेटकडे पाहिल्यावर येत आहे. अनेक भारतीय भाषांना बॅलेट मतदानपद्धतीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
 • यामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे.
 • मिलन वैष्णव यांनी बॅलेट बॉक्सचा फोटो शेअर केला असून यामध्ये इंग्रजीबरोबरच हिंदी, तेलगु, गुजरातीसहीत एकूण पाच वेगवेगळ्या भाषा दिसत आहेत.
 • दुसऱ्या एका युझरने सॅण्टा क्लॅरा कंट्रीमध्ये मतदारांना ईमेलच्या माध्यमातून मत देताना सहा भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
 • यामध्ये तामिळ, तेलगु, पंजाबी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2020)

अमेरिकेत रेमडेसिविरला अधिकृत मान्यता:

 • जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार करोनाच्या गंभीर रुग्णात गुणकारी ठरत नसलेल्या रेमडेसिविर या औषधाला अमेरिकेच्या औषध प्रशासनाने मात्र करोनावरील पहिले अधिकृत औषध म्हणून मान्यता दिली आहे.
 • याआधी त्याला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता दिली होती.
 • या औषधाची निर्मिती करणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या गिलीड सायन्सेस इन्कार्पोरेशन या संस्थेने म्हटले आहे, की रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्ण15 दिवसात बरे होण्याऐवजी दहा दिवसात बरे होऊ लागले.
 • या औषधाचे दुसरे नाव वेकलुरी असून ते औषध 12 वर्षांवरील किमान 40 किलोपेक्षा जास्त वजनाच्या व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेल्या करोना रुग्णांवर उपयोगाचे आहे.
 • पन्नास देशांत रेमडेसिविरला करोनावरील तात्पुरते औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्स चा दणदणीत विजय साजरा- IPL 2020:

 • चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय साजरा केला.
 • जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त 114 धावा केल्या होत्या.
 • किशनने नाबाद 68 तर डी कॉकने नाबाद 46 धावा केल्या आणि मुंबईला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.
 • IPLच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नईचा संघ प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे मुंबईविरूद्धच्या पराभवामुळे चेन्नईला दुहेरी दणका बसला.

दिनविशेष:

 • 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक विकास माहिती दिन तसेच जागतिक पोलियो दिन आहे.
 • सन 1605 मध्ये मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
 • विल्यम लसेल यांनी सन 1851 मध्ये उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
 • सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
 • भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे सन 1984 मध्ये कोलकाता येथे सुरू झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.