24 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा
भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा

24 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 मे 2020)

जागतिक बँकेतील पदावर आभास झा :

 • जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तर जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती आहेत, त्या दक्षिण आशियात वापरण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असणार आहे.
 • तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
 • हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे.
 • सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मे 2020)

जून-जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता :

 • देशांतर्गत विमानसेवेप्रमाणे आंतरराष्ट्रीय सेवाही पूर्ववत करण्याचे संकेत नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी शनिवारी दिले.
 • तर जूनच्या मध्यात वा जुलैच्या अखेरीसही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा सुरू केली जाऊ शकते. त्यासाठी ऑगस्ट वा सप्टेंबपर्यंत वाट पाहण्याची गरज लागणार नाही.
 • करोना संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी बदलते त्यावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पुरी यांनी सांगितले.
 • करोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचे निश्चित स्वरूप दिसत आहे. त्यात बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे. शिवाय, करोनाशी संघर्ष करत नजीकच्या भविष्यात आपापले व्यवहार सुरू ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा जून-जुलैमध्ये टप्प्याटप्याने पूर्ववत होऊ शकेल, असे पुरी म्हणाले.

भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम :

 • भारताचे मँगो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी कलीमुल्लाह खान यांनीही अगदी हटके पद्धतीने या कोवीड योद्ध्यांना समाल केला आहे.
 • तर आंब्याच्या वेगवेगळे वाण विकसित करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाले्या खान यांनी नुकत्याच दोन नवीन वाण तयार केले आहे.
 • तसेच हे दोन्ही वाण त्यांनी कोवीड योद्ध्यांना समर्पित करत एका वाणाचे नाव ‘डॉक्टर आंबा’ तर दुसऱ्याचे ‘पोलीस आंबा’ असं ठेवलं आहे.
 • बायगत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये 1600 वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात.
 • उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या 20 एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी 8 एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात.
 • तर त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर 300 प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं.
 • तसेच आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना 2008 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

La Liga स्पर्धेला स्पेन सरकारची मंजुरी :

 • जर्मन सरकारने Bundesliga स्पर्धेला मान्यता दिल्यानंतर, स्पेन सरकारनेही La Liga ही फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरु करण्याला संमती दिली आहे.
 • 8 जून पासून ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळवली जाणार असल्याचं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो शँचेझ यांनी जाहीर केलं.
 • तर करोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यानंतर स्पेनमधील सर्व महत्वाच्या फुटबॉल स्पर्धा 12 मार्च रोजी स्थगित करण्यात आल्या होत्या.
 • La Liga च्या आयोजकांनी याबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही अध्यक्ष जेविअर टेबस यांनी स्पर्धा लवकरात लवकर सुरु होईल अशी माहिती दिली होती.

दिनविशेष :

 • तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश 24 मे 1844 मध्ये वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
 • न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस 24 मे 1883 मध्ये खुला झाला.
 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-3 बी हा उपग्रह 24 मे 2000 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
 • 24 मे 2001 रोजी 18व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मे 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.