24 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

अ‍ॅश्ले बार्टी
अ‍ॅश्ले बार्टी

24 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 मार्च 2022)

बार्टीची निवृत्तीची घोषणा :

  • तीन ग्रँडस्लॅम विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅश्ले बार्टीने वयाच्या 25व्या वर्षी टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
  • दोन महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या बार्टीने अचानक केलेल्या घोषणेमुळे चाहते व अन्य टेनिसपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बार्टीने बुधवारी ‘इन्स्टाग्राम’वर चित्रफीत प्रकाशित करत टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली.
  • तसेच बार्टीने आपल्या कारकीर्दीत तीन ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली.
  • तर तिला फ्रेंच, विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन या ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्यात यश आले.
  • बार्टी गेले सलग 114 आठवडे महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होती.
  • तसेच तिने मागील 26 पैकी 25 सामने जिंकले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मार्च 2022)

‘नोव्हावॅक्स’च्या कोविड लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता :

  • जगभरातील सर्वच देश करोना विरोधात लढा देत आहेत, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे.
  • नोव्हावॅक्सच्या करोनावरील लशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.
  • तर ही लस 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनी दिली जाईल.
  • नोव्हावॅक्सची ही लस NVX-CoV2373 म्हणूनही ओळखली जाते.
  • भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)ही लस बनवत आहे.
  • भारतात ती Covovax या नावाने ओळखली जाईल. ही पहिली प्रोटीन-आधारित लस आहे.
  • तर, कोवोव्हॅक्स ही भारतातील चौथी अशी लस आहे जी देशात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल.
  • याआधी भारतात बायोलॉजिकल ई ची Corbevax, झायडस कॅडिलाची ZyCoV-D आणि भारत बायोटेकची Covaccine 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर वापरली जात होती.

पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :

  • पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा या पदावरील दुसरा कार्यकाळ सुरू झाला.
  • परेड ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील आणखी आठ सहकाऱ्यांना शपथ देण्यात आली.
  • विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवडय़ांनी झालेल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक उच्चपदस्थ नेते उपस्थित होते.
  • राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमित सिंग यांनी मंत्र्यांना शपथ दिली.
  • उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत 70 पैकी 47 जागांसह दणदणीत विजय मिळवून भाजप पुन्हा सत्तेवर आला असला, तरी धामी हे खातिमा या त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातून निवडून येऊ शकले नव्हते.
  • तर आता मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक आहे.

‘आयपीएल’साठी 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी :

  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या अध्यायाला शनिवारपासून मुंबईत प्रारंभ होत असून, स्टेडिमयमध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.
  • वानखेडे स्टेडियमवर 26 मार्चला गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.
  • करोनाच्या साथीतून सावरल्यानंतर प्रथमच ‘आयपीएल’साठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे.
  • लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या दोन नव्या संघांच्या समावेशामुळे यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये 74 सामने होतील.
  • तर यापैकी 70 साखळी सामने मुंबईत होणार आहेत.

दिनविशेष:

  • 24 मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1855 मध्ये आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
  • अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच सन 1896 मध्ये रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.
  • सन 1923 यावर्षी ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
  • भारतीय हॉकी खेळाडू ‘एड्रियन डिसूझा‘ यांचा जन्म 24 मार्च 1984 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.