24 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 March 2019 Current Affairs In Marathi

24 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 मार्च 2019)

राज्यातील चौघांना ललित कला अकादमी पुरस्कार:

  • ललित कला अकादमीच्या 60व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील 15 कलावंतांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, सचिन चौधरी, डगलस जॉन, जीतेंद्र सुतार यांचा समावेश आहे.
  • या पुरस्कारांचे वितरण मुंबईत होणार आहे. ललित कला अकादमी हे प्रतिभावंत कलाकार व कलांचा गौरव करणारे व त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारे व्यासपीठही आहे.
  • कला मेळ्यातील प्रदर्शनासाठी कलाकृतींची निवड करणाऱ्या समितीत, तज्ज्ञ, समीक्षक व ज्येष्ठ कलावंतांचा समावेश होता.
  • तसेच भगवान चव्हाण, जयप्रकाश जगताप, जयंत गजेरा, किशोर ठाकूर, मदन लाल, मनीषा राजू व ओपी खरे यांनी कलाकृतींची निवड केली आहे.

‘करमबीरसिंह’ भारतीय नौदलाचे नवे प्रमुख असणार:

  • व्हाइस ऍडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. विद्यमान नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा हे 30 मे रोजी निवृत्त होत असून, ते करमबीर यांच्याकडे सूत्रे सोपवतील. ही नियुक्ती करताना पारंपरिक सेवा ज्येष्ठतेचा निकष न लावता सद्यपरिस्थितीत आवश्‍यक असलेल्या गुणांच्या जोरावर निवड केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. karambir-singh
  • व्हाइस ऍडमिरल करमबीरसिंह हे सध्या विशाखापट्टणम येथे नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख आहेत. करमबीर हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) विद्यार्थी आहेत. ते जुलै 1980 मध्ये नौदलात दाखल झाले होते.
  • 1982 मध्ये नौदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी चेतक आणि कामोव्ह हेलिकॉप्टरमधून अनेक उड्डाणे केली आहेत. नौदलाचे नेतृत्व करणारे ते कदाचित पहिलेच वैमानिक ठरतील, असे एका नौदल अधिकाऱ्याने सांगितले.
  • तसेच त्यांना आतापर्यंत उत्कृष्ट सेवेसाठी परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तटरक्षक दलाची नौका चांदबीबी, आयएनएस विजयदुर्ग, आयएनएस राणा आणि आयएनएस दिल्ली या नौकांचे नेतृत्व केले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मार्च 2019)

BCCI कडून सैन्य दलांना 20 कोटींची मदत:

  • IPL 2019 या स्पर्धेला 23 मार्च पासून प्रारंभ झाला. या स्पर्धेचा सलामीचा सामना भारताच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये रंगला आहे. महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
  • या दरम्यान, दरवर्षी होणारा उदघाटन सोहळा यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आला. या वर्षी सलामीच्या सामन्याआधी मिलेट्री बँडच्या गजरात स्पर्धेची सुरुवात झाली आणि BCCI कडून सैन्य दलांना 20 कोटींची मदत देण्यात आली.
  • चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये सशस्त्र सेना दलांना सन्मानित करण्याचा एक कार्यक्रम सामन्याच्या आधी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात BCCI कडून सशस्त्र सेना दलासाठी 20 कोटी रुपयांचा मदत निधी देण्यात आला.
  • भारतीय लष्कराला 11 कोटी, CRPF ला 7 कोटी आणि वायु दल व नौसेनेला प्रत्येकी 1-1 कोटींची मदत BCCI कडून करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाआधी मिलेट्रीचा (लष्कराचा) मद्रास रेजिमेंट बँडचे वादन झाले.
  • तर या स्पर्धेचा उदघाटन सोहळा कायम गाजावाजा करत पार पडतो. पण या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी होणार  खर्च हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात आला.
  • BCCI च्या प्रशासकीय समितीचे (CoA) प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती काही दिवसांपूर्वीच दिली होती.

उमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती:

  • ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतीच घोषणा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली आहे. uma-bharti
  • उमा भारती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. 2016 मध्ये उमा भारती यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते. 22 मार्च रोजी याबाबत त्यांनी निर्णय घेतला आहे.
  • ‘उमा भारती यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पक्षासाठी काम करायचे आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे’, असे जेपी नड्डा यावेळी म्हणाले.
  • नवी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘जर मी लोकसभा निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती’. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानतात.
  • 2016 मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे, पुढील दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार आहे.

दृष्टिहीनांसाठी आता नोटा ओळखणे सोपे होणार:

  • दृष्टिहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात, यासाठी रिझर्व्ह बॅंक मोबाईल ऍपची निर्मिती करणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने 22 मार्च रोजी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती देण्यात आली.
  • नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड‘ या संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. रिझर्व्ह बॅंकेने चलनात आणलेल्या नव्या नोटा दृष्टिहीनांना ओळखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने प्रतिज्ञापत्र दाखल केले.
  • याचिकाकर्त्यांच्या मागणीबाबत रिझर्व्ह बॅंकेने सहमती व्यक्त केली आहे. याबाबत चारसदस्यीय तज्ज्ञ समितीही नेमली होती. अंध व्यक्तींना नोटा ओळखण्यासाठी एखादे उपकरण किंवा यंत्रणेपेक्षा मोबाईल ऍप अधिक उपयुक्त आणि सुलभ ठरेल, अशी शिफारस या समितीने पाहणीनंतर केली. ही शिफारस मान्य करून पुढील कार्यवाही सुरू केल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले.
  • तर या प्रक्रियेसाठी आणखी काही महिने लागू शकतात, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले. याचिकाकर्त्या संस्थेनेही दरम्यानच्या काळात तज्ज्ञांच्या मदतीने अशी एखादी यंत्रणा उभारण्याचा विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे.

दिनविशेष:

  • 24 मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1855 मध्ये आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
  • अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच सन 1896 मध्ये रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.
  • सन 1923 यावर्षी ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
  • भारतीय हॉकी खेळाडूएड्रियन डिसूझा‘ यांचा जन्म 24 मार्च 1984 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 मार्च 2019)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.