24 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

24 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 जून 2022)

सिडनी विद्यापीठातील संशोधन :

 • हरितगृह वायू उत्सर्जनासाठी उद्योग आणि संबंधित बाबीच जबाबदार नाहीत, तर परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या अन्नामुळेदेखील हे उत्सर्जन वाढत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.
 • भाजीपाला आणि फळांची वाहतूक करताना विशिष्ट तापमान आवश्यक असते. ही तापमान नियंत्रित अन्न वाहतूक करताना हरितगृह वायू उत्सर्जनात भर पडत आहे.
 • त्यामुळे हवामान संकट टाळायचे असेल तर परदेशातून आयात केलेले अन्न न खाता, देशात पिकवलेले अन्न खायला हवे, असा सल्लादेखील या संशोधनाद्वारे देण्यात आला आहे.
 • सिडनी विद्यापीठाच्या अरुणिमा मलिक आणि मेंग्यू ली यांचे हे संशोधन आहे.
 • अन्न पिकवणाऱ्या देशातून इतर देशांदरम्यान अन्नाची वाहतूक केल्यामुळे सुमारे एक पंचमांश हरितगृह वायू उत्सर्जन होते आणि दुर्दैवाने यात समृद्ध देशाचे योगदान मोठे आहे.
 • जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 16 दशलक्ष टन हरितगृह वायू उत्सर्जन केवळ तापमान नियंत्रित अन्न वाहतुकीमुळे होते.
 • हे प्रमाण एकूण मानवनिर्मित कार्बन उत्सर्जनाच्या 30 टक्के आहे. या वाहतुकीशिवाय जमीन वापरातील बदल आणि उत्पादन प्रक्रियेमुळेदेखील उत्सर्जन होते.
 • पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.
 • जागतिक स्तरावर फळ आणि भाज्यांच्या वाहतुकीमुळे सुमारे 36 टक्के अन्न वाहतूक उत्सर्जन होते. उत्पादनादरम्यान जेवढे उत्सर्जन होते, त्याच्या दुप्पट हे उत्सर्जन आहे.
 • कारण भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीदरम्यान विशिष्ट तापमानाची गरज असते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जून 2022)

चेरापुंजीत यंदा नवा जलविक्रम :

 • देशातील सर्वाधिक पावसाच्या स्थळांपैकी एक असलेल्या मेघालयातील चेरापुंजी येथे हंगामाच्या पहिल्या तीनच आठवडय़ात तब्बल 4760 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.
 • गेल्या काही वर्षांत दोन ते तीन वेळा चेरापुंजीलाही पावसात मागे टाकत आघाडी घेणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मात्र या कालावधीत केवळ 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली .
 • त्यामुळे चेरापुंजीची पावसातील आघाडी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
 • मेघालयातील चेरापुंजी आणि महाराष्ट्रातील घाट विभागातील महाबळेश्वर यांची तुलना कधी होत नव्हती.
 • मात्र, 2018, 2019 या दोन वर्षांमध्ये एकूणच मेघालयात आणि चेरापुंजीत पावसाचे प्रमाण घटले होते.

मेल, एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांतून सर्वसाधारण तिकिटावर प्रवास :

 • करोना काळात बंद करण्यात आलेली मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांतील सर्वसाधारण (जनरल) तिकीट सुविधा 29 जूनपासून पुन्हा सुरू होत आहे.
 • आता मात्र प्रवाशांना सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करता येणार आहे.
 • करोना काळात अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांमध्ये सर्वसाधारण डब्यासाठीदेखील तिकीट आरक्षित करावे लागत होते.
 • टाळेबंदी शिथिल झाल्यानंतरही रेल्वेने तेच धोरण कायम ठेवले.
 • करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 मार्च 2022 पासून रेल्वेच्या काही गाडय़ांमध्ये सर्वसाधारण तिकीट सुरू करण्यात आले. पण, ते मोजक्याच गाडय़ांसाठी होते.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला हॉकी संघाची घोषणा :

 • आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली.
 • पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने भारताची तारांकित आघाडीपटू राणी रामपालला या संघातही स्थान देण्यात आले नाही.
 • भारतीय संघाचे नेतृत्व गोलरक्षक सविता पुनिया करणार आहे, तर बचावपटू दिप ग्रेस एक्का उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल.
 • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
 • या दोन्ही खेळाडू नेदरलँड्स आणि स्पेन यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 1 ते 17 जुलैदरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत सारख्याच जबाबदाऱ्या पार पाडतील.

‘फिफा’ क्रमवारीत भारताची दोन स्थानांनी आगेकूच :

 • आशिया चषक पात्रता स्पर्धेतील शानदार कामगिरीचा फायदा भारतीय फुटबॉल संघाला गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या ‘फिफा’ क्रमवारीत झाला आहे.
 • दोन स्थानांची आगेकूच करीत भारतीय संघ क्रमवारीत 104व्या स्थानी पोहोचला आहे.
 • आशिया फुटबॉल महासंघाच्या सदस्यांमध्ये भारत 19व्या स्थानी आहे.
 • ब्राझीलने क्रमवारीत आपले अग्रस्थान कायम ठेवले असून बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
 • अर्जेटिनाने एका स्थानाच्या सुधारणेसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर फ्रान्सची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

लीसेस्टरशारयच्या संघात चार भारतीयांचा समावेश :

 • भारतीय संघातील चार तारांकित खेळाडू लीसेस्टरशायरकडून खेळणार आहेत.
 • ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा लीसेस्टरशायरच्या संघाकडून सराव सामन्यात भाग घेणार आहेत.
 • लीसेस्टरशायरच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश झाल्यामुळे संघातील सर्व सदस्यांना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेसा सराव करण्याची संधी मिळणार आहे.
 • वर्कलोड मॅनेजमेंट पाहता दोन्ही संघातून 13-13 खेळाडू खेळतील.
 • याशिवाय, भारतीय निवड समितीने नवदीप सैनी, कमलेश नागरकोटी आणि सिमरजीत सिंग यांना इंग्लंड दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • सध्या सैनी आणि नगरकोटी संघासोबत आहेत तर सिमरजीत सिंग लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.

दिनविशेष :

 • 24 जून 1441 मध्ये इटन कॉलेजची स्थापना.
 • फ्रान्समधील पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब 24 जून 1793 मध्ये केला गेला.
 • 24 जून 1939 मध्ये सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
 • कर्नाटकातील सर्व शाळांत 24 जून 1982 मध्ये कन्नड शिकविण्याची सक्ती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जून 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.